Uddhav Thackeray Birthday Sakal
महाराष्ट्र बातम्या

अजूनही पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच! बंडखोर नेत्यांच्या सूचक शुभेच्छा

एकनाथ शिंदेंनी माजी मुख्यमंत्री तर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी पक्षप्रमुख असा उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने बंडखोरांचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र त्यांनी ठाकरेंचा 'शिवसेना पक्षप्रमुख' असा उल्लेख टाळला. मात्र काही बंडखोर नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख पक्षप्रमुख असाच केला आहे. (Uddhav Thackeray Birthday Wishes)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंना माजी मुख्यमंत्री असं म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र काही बंडखोर नेत्यांनी शुभेच्छा देताना ठाकरेंचा उल्लेख पक्षप्रमुख असाच केला आहे. त्यामुळे बंडखोरांचे नेते अजूनही उद्धव ठाकरेच (Uddhav Thackeray) आहेत का? शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून अजून उद्धव ठाकरेच आहेत, असं बंडखोर नेते मानतात का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख पक्षप्रमुख असाच केला आहे. तर माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनीही शिवसेना पक्षप्रमुख असाच उद्धव ठाकरेंचा उल्लेख केला आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना माजी मुख्यमंत्री असं संबोधलं आहे. त्यामुळे आता शिंदे गटातही फूट पडलीये का, की शिंदे गटातल्या नेत्यांना अजूनही उद्धव ठाकरेच आपले प्रमुख वाटतात, अशा चर्चा सुरू आहेत.

दरम्यान, राज्यातला मंत्रिमंडळ विस्तार गेल्या महिनाभरापासून रखडला आहे. अशात शिंदे गटातल्या अनेक नेत्यांना मंत्रिपदाची आशा आहे. मात्र विस्तार रखडल्याने शिंदे गटात अस्वस्थता दिसून येत आहे. शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरेही सुरू आहेत. तर शिंदे गटातले अनेक नेते सातत्याने शिंदेंच्या भेटी घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT