Maharashtra Politics News | Hari Narke Criticeze BJP
Maharashtra Politics News | Hari Narke Criticeze BJP 
महाराष्ट्र

हे आहे अस्सल पेशवाई हिंदुत्व, बंडखोर आमदारांवरून भाजपला सणसणीत टोला

सकाळ डिजिटल टीम

आमदार निधीतून मलिदा खाणारे बायकोला साधं लुगडं घेऊ शकत नाहीत, म्हणत अश्रू गाळणार, किती अन्याय!

राज्यात सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. शिवेसना नेते एकनाथ शिंदे बडंखोर आमदारांसोबत गुवाहाटी येथे आहेत. शिंदे गटाजवळ या घडीला ५० आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यातील सुरु असलेल्या या राजकीय घडामोडींवर आता इतिहास अभ्यासक प्रा. हरी नरके यांनी ताशेर ओढले आहेत. अप्रत्यक्षरित्या त्यांनी सेनेतील गुवाहाटी येथे असलेल्या बंडखोर आमदारांना आणि भाजपला टोले लगावले आहेत.(Hari Narke Criticeze BJP)

प्रा. हरी नरके यांनी यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणतात, डोंगारफेमस तत्वनिष्ठ आमदारांची स्वामिनिष्ठ कहाणी सादर केली जात होती. हे आमदार काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असा पक्षांतराचा प्रवास करत सध्या महासत्तेच्या गुवाहाटी कोंडवाड्यात आलेले आहेत. याला म्हणतात पक्षनिष्ठा! ही त्यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे. या आमदारांची पहिली टर्म पूर्ण झाली आहे. ज्यांना वर्षाकाठी लाखो रुपये पेन्शन मिळते आणि आता दुसऱ्या टर्मला दरमहा लाखो रुपये वेतन व भत्ते मिळत आहे, ते आमदार म्हणतात की, माझी बायको पाटलाची सून असून तिला नवं लुगडं ते घेऊ शकत नाहीत. किती ही गरिबी!, असे म्हणत त्यांनी आमदार शहाजी पाटलांना टोला लगावला आहे. (Maharashtra Politics News)

यानंतर त्यांनी ट्वीटमध्ये आमदारांना मिळणाऱ्या निधीवर त्यांनी भाष्य केलं आहे. आमदारांना वर्षाला काही कोटी रुपये आमदार फंड मिळतो. तो सार्वजनिक कामांवर खर्च करताना त्यातील किमान ३५% मलिदा ज्या आमरांना व्यक्तिगत भेट म्हणून मिळतो, ते आमदार रड्याची भाषा करत आहेत. राजकारणासाठी घरादाराची राखरांगोळी केली असून ते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे ते बोलत आहेत. जे आपल्या निम्म्या वयाच्या विरोधीपक्ष नेत्यांना 'आपला बाप' मानतात आणि आसाम बापू त्यांच्याकडे मुलासारखे बघतात, केवढा हा त्याग!, असंही ते म्हणाले आहेत.

दरवेळी आपल्यासाठी सढळ हाताने थैल्या पुरवतात. पण मुख्यमंत्री ठाकरे मात्र आपल्याला श्रद्धांजली सभेत बोलू देत नाहीत, म्हणून आपण शिवसेना सोडली असे म्हणता. जे आमदार गणपतराव देशमुखांच्या अकराव्या टर्मलासुद्धा एसटीच्या लाल्डब्याने फिरायचे त्यांना पाडून सत्ताधारी बनलेले हे आमदार. आपल्या मतदार संघाला फक्त बारा कोटीच मिळाले किती हा अन्याय, असे म्हणतात. पक्ष सोडणारे पक्षनिष्ठा शिकवणार, लाखो रुपये वेतन, पेन्शन घेत आमदार निधीतून मलिदा खाणारे बायकोला साधं लुगडं घेऊ शकत नाहीत, म्हणून अश्रू गाळणार. किती हा अन्याय! हे आहे अस्सल पेशवाई हिंदुत्व!, असं म्हणत त्यांनी सणसणीत टोला लगावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singapore Airlines: लंडनहून सिंगापूरला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये टर्ब्युलन्समुळे एका प्रवाशाचा मृत्यू, तर अनेक जण जखमी

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी सपाट बंद; निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक प्रथमच 52,000च्या वर, कोणते शेअर्स चमकले?

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहचा पाय खोलात! कोर्टानं ७ विविध कलमांतर्गत केली आरोप निश्चिती

Blackout Teaser Out: "वक्त बदलने वाला है!"; '12 वी फेल' फेम विक्रांतच्या 'ब्लॅकआऊट'चा जबरदस्त टीझर रिलीज

HSC Result : पत्रकार व्हायचंय? 12वी नंतर काय कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT