Sanjay Mandlik,Hasan Mushrif Esakal
महाराष्ट्र बातम्या

KDCC Election: हसन मुश्रीफ, संजय मंडलिकांनी बजावला मतदानाचा हक्क

जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : जिल्हा बँकेसाठी (KDCC Bank Election)आज सकाळपासूनच चुरशीने मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif)तसेच शिवसेना (Shivsena) खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik)यांनी मतदानाचा हक्क बजावला. सत्तारुढ पक्षाच्या कार्यकर्त्यानी पिवळ्या टोप्या घालून मतदान केंद्रावर हजेरी लावली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर अंत्यंत चुरस निर्माण झाल्याचे चित्र सकाळच्या एक तासाच्या मतदान वेळतच पाहायला मिळत आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. विकास संस्था गटातील १२ पैकी सहा जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १५ जागांसाठी ही निवडणूक आहे. निवडणूक रिंगणात ३३ उमेदवार उतरले असून अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी या निवडणुकीत शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली समविचारी पक्षांचे एकत्रित पॅनेल रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. विकास संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्या असल्या तरी त्या तालुक्यात या गटातील मतदारांना राखीव जागांवरील उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. मतदानासाठी कोल्हापूर शहर व करवीर तालुक्यातील मतदारांसाठी शहरात एक तर अन्य ११ तालुक्यात ३९ केंद्रावर मतदानाची सोय केली आहे.

प्रक्रिया संस्था व नागरी बँक पतसंस्था गटातील निवडणुकीत मोठी चुरस आहे. प्रक्रिया गटातून खासदार प्रा. संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील हे विद्ममान संचालक विरोधी पॅनेलमधून रिंगणात आहेत तर त्यांच्या विरोधात प्रदीप पाटील-भुयेकर व मदन कारंडे हे सत्तारूढ गटाचे उमेदवार आहेत. पतसंस्था गटातून विद्यमान संचालक अनिल पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत, त्यांच्या विरोधात सत्तारूढ गटातून आमदार प्रकाश आवाडे व विरोधी पॅनेलमधून प्रा. अर्जुन आबिटकर रिंगणात आहे. मातब्बरांच्या उमेदवारीमुळे या दोन गटातील लढत लक्षवेधी बनली असून त्यामुळे नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी (ता. ७) होणार आहे.

दृष्टिक्षेपात निवडणूक

एकूण संचालक २१

बिनविरोध जागा - ६

निवडून द्यायच्या जागा - १५

रिंगणातील उमेदवार - ३३

बँकेचे मतदार - ७ हजार ६५१

मतदान केंद्राची संख्या - ४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment : जिद्दीला सलाम! गवंडी काम करत धरणग्रस्त शब्बीर सय्यद यांची मुंबई लोहमार्ग पोलीस भरतीत चमकदार झेप

Who is Krish Bhagat? ३ दिवसांपूर्वी रिप्लेसमेंट, आज Mumbai Indians कडून पदार्पण; आमदाराचा पुतण्या IPL 2026 गाजवण्यासाठी सज्ज

Maharashtra Police Transfers : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या एसपींची बदली, पोलिस प्रशासनात मोठे बदल

Nashik Crime : भोंदू खरातला पाचव्या गुन्ह्यात २३ पर्यंत कोठडी; बचावपक्षाचा जोरदार विरोध

Chakur Crime News: नवऱ्याच्या प्रेयसीला फसवण्यासाठी चुलतीकडून पुतण्याचा खून

SCROLL FOR NEXT