hasan mushrif sakal
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif l कोल्हापुरात जयश्री जाधवच विजयी होणार; हसन मुश्रीफ

सगळ्या केंद्रीय यंत्रणांवरती पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर: महिला उमेदवार असताना व्यक्तीगत टीका करण विरोधकांना शोभत नाही. शहराचा विकास कसा करणार आहोत या मु्द्द्यावर निवडणुका व्हायला हव्यात. परंतु खालच्या थरावर प्रचार होत असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर (Kolhapur) शहराचा विकास कसा करणार हे व्हिजन घेऊन आम्ही निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीच्या (MahaVikas Aghadi) उमेदवारच विजयी होतील असा दावा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केला.

पुढे ते म्हणाले, सगळ्या केंद्रीय यंत्रणावरती पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली हे चंद्रकांत पाटलांना कस कळलं असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. संजय राऊतांचा विषय राज्यसरकारचे खासदार म्हणून घेतला असेल. यंत्रणाचा गैरवापर यावर त्यांनी चर्चा केली असल्याचे सांगत भाजपावर टीका केली.

सगळ्या केंद्रीय यंत्रणांवरती पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली आहे. मोदी आणि शरद पवार यांच्यात काय चर्चा झाली हे चंद्रकांत पाटलांना कस कळलं.

पाच वर्षात भाजपाचे व्हिजन दिसले नाही. गेल्या अडीच वर्षात आमच्या सरकारने काय केले आणि पुढे काय करणार आहोत हे सतत सांगत आलो आहोत असेही ते म्हणाले. तिन्ही पक्षाचा वचननामा यापूर्वी प्रसिध्द केला असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूरचा सर्वांगिन विकास करणार असून, चांगले शहर बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT