hasan mushrif ED Raid bjp samarjit ghatge connection Kolhapur kagal Maharashtra politics  
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif ED Raid : हसन मुश्रीफांच्या ईडी कारवाईमागे समरजीत घाटगेंचा हात?

Komal Jadhav (कोमल जाधव)

Hasan Mushrif ED Raid : तारीख ७ जानेवारी २०२३... ठिकाण- कोल्हापूर जिल्ह्यातला कागल तालुका... चर्चेचा विषय- ईडी कारवाई… भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच हमरीतुमरी... आता तुम्ही म्हणाल हे काय? तर आज ११ जानेवारीच्या सकाळी झालेल्या ईडी कारवाईची चर्चा कोल्हापुरातल्या कागल तालुक्यात मागील ४-५ दिवसांपासून सुरुच होती.

अशातच आता मुश्रीफांवर झालेल्या कारवाईमागे समरजीत घाटगेंचं कनेक्शन असल्याचं बोललं जातंय पण ते का? तेच जाणून घेऊयात-

कोल्हापूर जिल्ह्यातला कागल तालुका... अन् इथले दोन प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ आणि दुसरे म्हणजे कोल्हापूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे.

दोघांबद्दल बोलायचं झाल्यास दोघेही कागल तालुक्यातले परस्परविरोधी नेतृत्वं. एकाला ४० वर्षांची राजकीय कारकीर्द आणि सामाजिक कार्याचा अनुभव आहे, तर दुसरे हे थेट छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहेत आणि मागील एका दशकाहून अधिक काळ सक्रीय राजकारणात आहेत.

एकाचे गुरु हे थेट शरद पवार आहेत आणि आरोग्य क्षेत्रात मोठं काम आहे, तर दुसऱ्याला भाजपातील नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांचं चांगलंच पाठबळ आहे आणि छत्रपती शाहू सहकारी कारखान्याचे संचालकही आहेत. मुश्रीफ आणि घाटगे या दोन नेत्यांमधील टशनमुळे कागल तालुक्याकडे कायमच भाजपा विरुद्ध राष्ट्रवादीतली प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिली जाते.

मुश्रीफांनी आतापर्यंत रेशन घोटाळा, विधवा महिलांच्या पेन्शनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप घाटगेंकडून करण्यात आलेत तर वाघाचं काळीज असेल तर भ्रष्टाचाराचा एकतरी आरोप सिद्ध करुन दाखवा असं चॅलेंजही मुश्रीफांनी घाटगेंना दिलं होतं.

त्यातच आज सकाळी ६ वाजता मुश्रीफांच्या घरी झालेल्या ईडी कारवायांबाबत घाटगे आणि समर्थकांकडून मागील ५ दिवसांपासून बातम्या पेरल्या जात होत्या, असा आरोप आज मुश्रीफांनी पत्रकार परिषदेत थेट नाव न घेता केलाय.

केंद्रीय यंत्रणांच्या कारवाईसाठी कागलमधील एक नेता वारंवार दिल्ली वाऱ्या करत होता, असं आज मुश्रीफांनी म्हटलंय. तर तिकडे राष्ट्रवादीच्या अजित पवार, सुप्रिया सुळेंसह महाविकासआघाडीच्या नेतेमंडळींनीही राजकीय सूडापोटी भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावर बोट दाखवण्यात आलं.

त्यामुळे मागील काही वर्षांपासून तरी, मुश्रीफांवर आरोप केल्यानं घाटगे कायम चर्चेत आलेत आणि मुश्रीफांना तोड म्हणूनही भाजपानं त्यांच्याकडे नेतृत्व सोपवल्याची चर्चा आहे. तरी, आजही मुश्रीफांनी थेट नाव घेतलं नसलं तरी पत्रकार परिषदेतला रोष हा समरजीत घाटगेंकडे असल्याचं दिसून आलं. स्थानिक राजकीय वर्तुळातही तशीच चर्चा रंगली. पण खुद्द समरजित घाटगेंकडून मात्र त्यांच्या विरोधकावर झालेल्या ईडी कारवाईप्रकरणी अजूनतरी प्रतिक्रिया आलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT