Hasan Mushrif sakal
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांना कोर्टाचा मोठा झटका! अटकेची टांगती तलवार

Sandip Kapde

राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. कागल येथील साखर कारखाण्यात घोटाळा केल्याचा हसन  मुश्रीफ यांच्यावर आरोप आहे. 

मुंबई सत्र न्यायालयाने मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन अर्जाच्या निकालापर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण होते. मात्र ते संरक्षण आता संपले आहे. 

साखर कारखान्यातील गैरव्यवहारप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित असलेल्या पुण्यातील व्यावसायिकांवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने छापेमारी देखील केली होती. ईडीने पुणे शहरातील नऊ ठिकाणी छापे टाकले होते. हडपसरला, गणेशपेठ, प्रभात रोड, सिंहगड रोड आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.

काय आहे प्रकरण -

नलावडे साखर कारखाना प्रकरणी 11 मार्च रोजी ईडीने हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापा टाकला होता. मागील दोन महिन्यातील ही तिसरी छापेमारी होती. सकाळी सात वाजता ईडीचे पाच ते सहा अधिकारी कागल येथील मुश्रीफ यांच्या घरी आले आणि त्यांनी कागदपत्रांची छाननी सुरू केली. यावेळी मुश्रीफ यांच्या घराबाहेर सुरक्षा रक्षकांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुश्रीफ यांच्या घरातील लोकांनाही बाहेर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. त्यानंतर हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणी वाढल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E10 Fuel: E10 पर्याय पुन्हा आणावा, जुन्या वाहनांसाठी उपयुक्त; मुख्य आर्थिक सल्लागारांची केंद्र सरकारला सूचना

Madhya Pradesh Road Accident : गाईला वाचविण्याच्या प्रयत्नात पिकअप-डंपरची धडक, ८ मजुरांचा जागीच मृत्यू, ३२ गंभीर जखमी

Donald Trump: ट्रम्प म्हणाले, भारताकडून शिका! ज्ञानेश कुमारांच्या प्रश्नाचा अमेरिकेच्या निवडणुकीशी काय संबंध?

Marathi News Updates : पुण्यात खराब रस्त्यामुळे ११ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू, अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमरात कैद

Hidkal Dam 100% Full : हिडकल धरणातून पाच हजार क्युसेक विसर्ग; धरण 100 टक्के भरलं, घटप्रभा-हिरण्यकेशी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT