hasan mushrif 
महाराष्ट्र बातम्या

'भाजपाकडून सूडाचं राजकारण, ED पाठवून त्यांना वाटतं सत्ता येईल'

ज्या राज्यात त्यांच सरकार नाही, तिथं असा उद्योग भाजपकडून सुरु - मुश्रीफ

सकाळ डिजिटल टीम

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळी नवाब मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे (ED) टाकले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आता राष्ट्रवादीतील (NCP) दिग्गज नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येत आहे. हे एक दिवस होणार होतं. जाहीरपणे अनेक विषयांवर नवाब मलिक सतत विरोधात बोलत असल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे.

दरम्यान, आता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, कधी शिवसेनेच्या तर कधी राष्ट्रवादीच्या नेत्यांना नोटिस द्या, असे प्रकार सुरु आहेत. हे २० वर्षांपूर्वीचं प्रकरण आहे. कारवाई करायची होती तर त्यावेळीच करायला हवी होती. दहा वर्षे झालं मलिक सत्तेत आहेत, मग ही कारवाई आता अचानक का? ज्या राज्यात भाजपचं सरकार नाही, तिथं असा उद्योग भाजपकडून (BJP) सुरु आहे. भाजपला सत्ता गेल्यानं आलेली अस्वस्थता, वैफल्यग्रस्त यामुळे ते असं करत आहेत. भीती घातल्यानं सत्ता येईल असं भाजपला वाटत आहे. त्यामुळे ईडी आणि इतर काही घडामोडी पाहिल्या तर भाजपाकडून सूडाचं राजकारण सुरु असल्याची टीकाही मुश्रीफ यांनी केली आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्या घरी आज सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी अचानक धडकले आहेत. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहितीही मिळत आहे. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT