Hasan Mushrif Esakal
महाराष्ट्र बातम्या

Hasan Mushrif: 'मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही', असं कोल्हे खासगीत म्हणाले होते, हसन मुश्रीफांचा खुलासा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अमोल कोल्हेंनी 'मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही', असं म्हटलं असल्याचं सांगितलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावेळी पत्रकारांशी बोलताना खासदार अमोल कोल्हेंविरोधात दंड थोपटले. त्यावेळी अजित पवारांनी अमोल कोल्हे राजीनामा देणार होते असं म्हटलं होतं. 'मी राजीनामा देतोय, मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी, तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशाही गोष्टी त्यांनी येऊन सांगितलेल्या," असं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आता अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही अमोल कोल्हेंच्या बाबतीत काही खुलासे केले आहेत.

'मी पुन्हा निवडणूक लढवणार नाही', असं खासदार अमोल कोल्हे यांनी मला अनेकदा सांगितलं आहे. त्याच्यामुळे माझ्यावर शरद पवार आणि राष्ट्रवादीचा शिक्का बसला आहे. खासदारकीचा परिणाम माझ्या कामावर होतोय, असं ते मला अनेकदा खासगीत म्हणाले आहेत, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

तर अजित पवारांच्या वक्तव्यावर मंत्री हसन मुश्रीफ प्रतिक्रिया देताना म्हणाले की, 'अजित दादा कोणत्या तरी गोष्टीने नाराज झालेले असावेत असं मला वाटतं, त्यामुळेच ते म्हणाले असावेत'.

बच्चू कडू आणि शरद पवारांच्या भेटीवर काय म्हणाले हसन मुश्रीफ?

शरद पवार यांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे. शरद पवार आणि बच्चू कडू यांच्यात आज भेट झाली आहे. बच्चू कडूंनी शरद पवारांना चहाचे निमंत्रण दिल्यानंतर शरद पवार आज बच्चू कडू यांच्या निवासस्थानी गेले होते. शरद पवार आणि बच्चू कडू यांच्या होणाऱ्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगली आहे. तर ते महाविकास आघाडीत जाणार असल्याच्याही चर्चा सूरू होत्या, त्यावर मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पवार साहेबांनी ही भेट राजकीय नसल्याचं आधीच सांगितलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात बंद; निफ्टी 25,000 च्या जवळ, कोणते शेअर्स घसरले?

Latest Marathi News Live Update : नवी मुंबई विमानतळामुळे प्रवास सुखकर होणार- अजित पवार

Navi Mumbai: नवी मुंबईत स्वतंत्र पोलीस ठाण्याला मंजुरी, कुठे आणि का? जाणून घ्या...

Viral News: दारू पिणाऱ्यांनाच जास्त डास चावतात का...? काय आहे व्हायरल सत्य

घटस्फोटानंतर तब्बल 14 वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीने पुन्हा बांधली लग्नगाठ; नवरा करतो 'या' क्षेत्रात काम

SCROLL FOR NEXT