Rajesh tope Sakal
महाराष्ट्र बातम्या

दिवाळी नंतर कोरोनाची तिसरी लाट? राजेश टोपेंचे विधान

सकाळ डिजिटल टीम

नाशिक : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कोरोना निर्बंध काळजीपूर्वक शिथिल केले आहेत, जीविताचा धोका लक्षात घेऊनच राज्य सरकार पावलं उचलत आहे. अर्थकारण थांबू नये म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन व्यवसाय सुरू करायला परवानगी दिली आहे, असे नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगीतले दरम्यान राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबद्दल त्यांनी महत्वाचे विधान केले.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, राज्यात कुठेही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची सुरुवात झालेली नाही, मात्र दिवाळी नंतर कोरोना रुग्णसंख्येत स्पाईक येण्याची शक्यता असल्याचा टास्क फोर्सचा अंदाज असल्याचे ते म्हणाले. सध्या राज्यात टेस्टिंग कमी केलेल्या नाहीत. पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. दुसरी लाट फ्लॅट झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मुंबईत एक सुध्दा मृत्यू नाही, हा लसीकरणाचा फायदा असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.

तसेच लहान मुलांना लस देण्याबद्दल बोलताना, डोस उपलब्ध झाले आहेत, लहान मुलांच्या लस घेण्यासाठी इलिजीबल केलं असेल, तर आम्ही द्यायला तयार आहोत. लहान मुलांच्या लसीकरणास परवानगी द्यावी असी आमची केंद्र सरकारला मागणी असल्याचे टोपे यावेळी म्हणाले.

न्यासा ही ब्लॅक लिस्टड नाही

आरोग्य विभागाच्या रखडलेल्या परीक्षा रीतसर पद्धतीने होतील, पॅनल ऑफ एजन्सी ने सिलेक्शन केलं आहे असे सांगताना न्यासा ही कंपनी ब्लॅक लिस्टेड नाही असे टोपे यांनी स्पष्ट केले. पूर्ण विभागाने दिलेल्या सूचनांच न्यासा देखील पालन करत आहे. या जागा पारदर्शकपणे आणि गुणवत्तेवर घेतल्या जात असून विद्यार्थी हा आमचा केंद्रबिंदू आहे असे सांगताना विद्यार्थ्यांनी एक परीक्षा द्यायची का वेगवेगळ्या परीक्षा द्यायच्या याचा चॉईस विद्यार्थ्यांना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेश मूर्ती घडवण्याचं काम जोमात

SCROLL FOR NEXT