pune 
महाराष्ट्र बातम्या

पुणेकर पावसाने त्रस्त अन् पालकमंत्री युतीच्या चर्चेत व्यस्त  

सकाळ वृत्तसेवा

पुणे : तुफान पावसामुळे पुणे शहराची दैना उडालेली असताना आणि अकरा जणांचा जीव गेलेला असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील मात्र दिल्लीमध्ये शिवसेनेच्या बरोबरच्या युतीच्या जागा वाटपात मग्न होते. तर, खासदार गिरीश बापट पुण्यभूषण पुरस्काराच्या कार्यक्रमात बिझी होते.

नागरिकांचा एकीकडे संताप व्यक्त होऊन ते रस्त्यावर येत असताना प्रशासन हलविण्यासाठी लोकप्रतिनिधी मात्र, विधानसभेच्या तयारीत मग्न असल्याचे गुरुवारी सकाळचे चित्र होते. 

पुण्यात बुधवारी रात्री दहा ते गुरुवारी पहाटे दोन वाजेपर्यंत तुफान पाऊस झाला. त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. शहरातील बिबवेवाडी, अरण्येश्‍वर, तावरे कॉलनी, सिंहगड रस्ता, धायरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर गावठाण, एरंडवणा, दांडेकर पूल आदी भागात पाणी साचून ते हजारो नागरिकांच्या घरात शिरले. शहरात एकिकडे पावसाचा हैदोस सुरू असताना पालकमंत्री पाटील मात्र, शिवसेनेबरोबरच्या युतीसाठी चर्चा करण्यासाठी दिल्ली बसून आहेत. तर, खासदार बापट मात्र, बालगंधर्व रंगमंदिरात पुण्यभूषण कार्यक्रमात मग्न होते. दुसरीकडे रहिवासी संतप्त झाले आहेत. रस्त्यांवर, वस्त्यांमध्ये आलेल्या राडारोडा, चिखल तातडीने दूर करण्यासाठी त्यांना प्रशासनाची मदत हवी आहे. 

पुणेकरांना तात्काळ मदत देवू : मुख्यमंत्री
पुणेकरांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. काही जण वाहून गेली आहेत. एनडीआरएफच्या जवानांनी काही जणांना सुखरूप ठिकाणी पोचविण्यात मदत केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Police ACP Vivek Bhagat : महिला पत्रकारांसोबत गैरवर्तन भोवले, एसीपी विवेक भगत यांची पदोन्नती रोखली; सरकारचा अर्ध्या रात्री निर्णय

RBI Repo Rate: 7 ऑक्टोबरला मोठा निर्णय! FD करणाऱ्यांना मिळणार मोठा फायदा? जाणून घ्या काय बदलणार

अटक करणार नाही म्हणत १.३० लाखांची मागणी, लाच घेताना PSIला रंगेहाथ अटक; बोरिवली पोलीस ठाण्यात ACBची मोठी कारवाई

Marathi News Live Updates: विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न, त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही; लोकसेवा आयोगाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Suryakumar Yadav: सूर्याचा मोठा 'गेम' झाला... आधी विचारलं खेळणार का, त्याने हो म्हटलं अन् निवड समितीने संघाबाहेर केलं

SCROLL FOR NEXT