Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: नागपुरात मुसळधार पावसाची हजेरी; हवामान विभागाकडून विदर्भासह 'या' भागात ऑरेंज अलर्ट

Weather Update: राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. अशातच विदर्भात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरात सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. अशातच विदर्भात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. नागपुरात सकाळच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सकाळी कामाच्या वेळी पावसाने हजेरी लावल्याने नागरीकांची तारांबळ उडाली. पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

नागपुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. शहरातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे. भर दिवसा सर्वत्र काळोखासह पावसाला सुरवात झाली आहे. रस्त्यावरील वाहनांना अंधारामुळे दिवसा वाहनाचे दिवे लावावे लागत आहेत. हवामान विभागाकडून पूर्व आणि पश्चिम विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

नागपुरात ढगाळ वातावरण दिसून येत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. हवामान विभागाने विदर्भातील नागरीकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर आज अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, अकोला, भंडारा, चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘या’ शेतकऱ्यांना नाही कर्जमाफीचा लाभ! ३० सप्टेंबर २०२५ पूर्वीचे थकबाकीदार शेतकऱ्यांनाच दोन लाखांची पीक कर्जमाफी, वाचा...

महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२६-२७ जाहीर! राज्यात काय स्वस्त झालं, कोणत्या गोष्टी महागल्या? संपूर्ण यादी जाणून घ्या...

Iran-Israel War: दुबईकडे केवळ १० दिवस पुरेल एवढाच अन्नसाठा; फळही नाहीत अन् भाज्यांचाही तुटवडा

Pune News: ''पुण्यातील बाजारपेठ शहराबाहेर स्थलांतरित...'', केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं विधान

Baramati News : बारामती तालुक्याला वरदान ठरणाऱ्या नीरा कऱ्हा उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची मान्यता....

SCROLL FOR NEXT