Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : आजही राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज?

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये झपाट्याने बदल होताना दिसून येत आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणामध्ये झपाट्याने बदल होताना दिसून येत आहेत. राज्याच्या काही भागामध्ये गारासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यातील जवळपास सर्व भागांमध्ये मुसळघार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला आहे. राजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यासोबतच जळगाव, नाशिक आणि पालघर या जिल्ह्यांमध्येही आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर उद्यापासून (बुधवार) पाऊस विश्रांती घेईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. बुधवार नंतर पुन्हा एकदा थंडी वाढण्याची शक्यता आहे.

का पडतोय पाऊस?

नैऋत्य अरबी समुद्रापासून ३.१ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्याच वेळी कमी दाबाच्या हवेचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.

गारपीट का होते?

गारपीट होण्यासाठी दोन गोष्टी एकत्र येणे आवश्यक असते. पहिली म्हणजे जास्त उंचीवरून वाहणारी हवा आणि दुसरी म्हणजे या उंचीवरून वाहणाऱ्या हवेत बाष्पाचे प्रमाण जास्त हवे. सध्या अरबी समुद्रावरून बाष्प येत आहे. अशी स्थिती सध्या पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे होती.

यलो अलर्ट

मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, सोलापूर, मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड व विदर्भातील अकोला, अमरावती आदी जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे.

पुण्यात ढगाळ वातावरण

पुण्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पुढील चोवीस तासांमध्ये आकाश अंशतः ढगाळ राहून, ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता वर्तविली आहे. शहरात गुरुवारनंतर (ता. २८) पावसाचे सावट कमी होईल.

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे संकेत

बंगालच्या उपसागरातील चक्राकार वाऱ्याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. दक्षिण अंदमान आणि त्या लगतच्या दक्षिण थायलंडच्या भागात हे कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याची तीव्रता वाढून पुढील तीन ते चार दिवसांमध्ये चक्रीवादळात रूपांतर होईल, असे संकेत हवामान खात्याने सोमवारी दिले. दक्षिण बंगालच्या उपसागरात रविवारपासून चक्राकार वारे तयार झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT