Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात आज मुसळधार, वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आज पावसाचा जोर ओसरणार की वाढणार, हवामान विभागाचा अंदाज काय सांगतो

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज्याच्या अनेक भागातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे, पुणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि विदर्भातही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

तर आज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार आज कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

त्याचबरेबर गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे शहर परिसरात सखल भागात पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अनेक भागातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मुंबईत आजही अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

तर पुणे शहर परिसरात मात्र पुढील 3-4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT