Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यातील 6 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्यात हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार शनिवारी राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आजही राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.

राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या सर्व जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्याच्या इतर काही भागांमध्ये यलो अलर्टही देण्यात आला आहे.

येत्या 2-3 दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर मुंबई, ठाण्यातही आज पावसाची शक्यता आहे. तर राज्याती काही भागांमध्ये पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

विदर्भात गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, राज्याच्या काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

H-1B Visa US Rules : डोनाल्ड ट्रम्प भारतीयांना आणखी एक मोठा झटका देण्याच्या तयारीत; H-1B व्हिसा पूर्णपणे बंद होणार?

Rohit Sharma Video: रोहित टीम बसमधून उतरताना पाय घसरून पडला, पोलिसांसह सारे सावरायला धावले; विराट लांब उभा राहून फक्त...

दुष्काळाच्या झळा! सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Vivo X Fold 6 ची भारतात एन्ट्री! 'या' दिवशी होणार लाँच; 200MP कॅमेरा अन् 7000mAh बॅटरीसह मिळणार दमदार फीचर्स!

Badminton Association: महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्षपदी अरुण लखानी

SCROLL FOR NEXT