Sushma Andhare 
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Sushma Andhare helicopter crashes: ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे.

कार्तिक पुजारी

रायगड- ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांना घ्यायला गेलेल्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. यात पायलट सुखरुप असल्याचं कळतंय. महाडमध्ये सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आले होते. येथून त्या बारामती येथे सभेसाठी जाणार होत्या. पण, याठिकाणी हेलिकॉप्टर आल्यानंतर दुर्घटनाग्रस्त झालं आहे.

सुषमा अंधारे या सुखरुप आहेत. त्या हेलीपॅडवर पोहोचल्यावर त्यांना हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची माहिती मिळाली. सुषमा अंधारे यांचा राज्यभर दोरा सुरु आहे. त्यासाठी त्यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर महाड येथे आले होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र, हेलिकॉप्टरच्या अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया

सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, सकाळी एका प्रचारसाठी जाणार होतो. दिवसभरात दोन-तीन सभा होत्या. रात्रीची महाडची सभा करुन आम्ही रात्री येथे थांबलो होते. हेलिपॅडवर आलो तेव्हा हेलिकॉप्टर घिरट्या मारत होतं. अचानक ते कोसळलं. मी आणि माझा भाऊ हेलिकॉप्टरने प्रवास करणार होता. पण, सुदैवाने आम्हाला काहीही झालं नाही. आम्ही सुखरुप आहोत.

मी सुखरूप आहे माझ्यासह कॅप्टन आणि असिस्टंट आणि माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आम्ही सगळे सुखरूप आहोत चिंता नसावी, असं अंधारे म्हणाल्या. पुढील दौरा सुरुच राहणार असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. आज बारामती येथील सभेसाठी त्या उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले ब्रिजवरील वाहतूक ३ तासांनी सुरू; कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर, आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी

Mumbai Indians Playoff Scenario: मुंबई इंडियन्सचे आव्हान संपुष्टात? आता काही केलं तरी प्ले ऑफमध्ये पोहोचणे अशक्य; हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर सवाल, CSK चं काय?

How Mumbai Indians Still Qualify for Playoff? हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ नेमका कुठे कुठे चुकला? मुंबई इंडियन्सला १४ गुणांसह अव्वल चार मध्ये पोहोचता येईल का?

Dhamangaon Blaze: नागपूरमधील धामणगाव विद्यामंदिर गावात भीषण आग, ३०-४० घरे जळून खाक, लाखोंचे नुकसान

गोव्यात दारू प्यायल्यावर जास्त नशा का चढत नाही? ९९ टक्के लोकांना खरं कारण माहित नाही...

SCROLL FOR NEXT