Students
Students टिम ई सकाळ
महाराष्ट्र

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध

सकाळ डिजिटल टीम

राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाइन आणि वेळापत्रकानुसारच होतील, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) स्पष्ट केले होते. आता राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइनची (Helpline) सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी परिपत्रकाद्वारे दिली. या हेल्पलाइनसाठी संपर्क क्रमांक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दहावी आणि ४ ते ३० मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होणार, असे, राज्य मंडळातर्फे काही दिवसापुर्वी सांगण्यात आले. मात्र कोरोनाची भीती पाहता राज्य मंडळाने परीक्षेला अनुसरुन निर्माण होणाऱ्या समस्यांचे निरसन करण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली असून याद्वारे सकाळी नऊ ते सायंकाळी सात या कालावधीत समुपदेशन सुविधा देण्यात येणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) स्वयंअध्ययनाचा मार्ग मोकळा केला आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना विविध विषयांचा सराव करता यावा, या उद्देशाने प्रश्नपेढय़ा तयार करण्यात आल्या आहे. या प्रश्नपेढय़ा http://www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT