girish mahajan esakal
महाराष्ट्र बातम्या

दहा लाख जमा करा, हायकोर्टाचे भाजप आमदार गिरीश महाजन यांना निर्देश

भाजपचे नेते आमदार गिरीश महाजन यांना उच्च न्यायालयाने 10 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले

सकाळ डिजिटल टीम

सध्या ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोपही पहायला मिळत आहेत. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर आली आहे. भाजपचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना उच्च न्यायालयाने 10 लाख रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याच्या अधिसूचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिकांवर आज न्यायालयात सुनावणी झाली आहे.

दरम्यान, विधिमंडळाच्या नियमदुरुस्तीला जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले जाऊ शकत नाही, असा या याचिकेवर राज्य सरकारकडून आक्षेप घेण्यात आला आहे. त्यामुळे जनक व्यास आणि आमदार गिरीश महाजन यांच्या जनहित याचिका सुनावणी योग्य नाहीत असेही राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या सभापती निवडीच्या प्रक्रियेत केलेल्या सुधारणांना आव्हान देणारी त्यांची जनहित याचिका ऐकण्यासाठी 10 लाखांची पूर्वअट घातली आहे.

यानुसार भाजप नेते आमदार गिरीश महाजन यांना 10 लाख रुपये जमा करण्याचे हायकोर्टचे निर्देश दिले आहेत. आमदार महाजन यांच्या वकिलांमार्फत रक्कम भरू असे न्यायालयात सांगण्यात आले आहे. थेट मतदारांकडून होणाऱ्या मतदानाला गुप्त मतदान आवश्यक असणार आहे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT