accident esakal
महाराष्ट्र बातम्या

शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत २७२ अपघात

कुणाल संत

नाशिक : महामार्गांवर वाढलेले अपघात ही जिल्ह्यात चिंतेची बाब बनली आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातून गेलेल्या राष्ट्रीय व राज्य महामार्गावर 1 हजार 363 अपघात झाले आहे. यातच आता शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील मागील साडेतीन वर्षांमध्ये एकूण 272 अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शहरातून जाणाऱ्या महामार्गावर होणारे अपघात नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि पोलिस महासंचालक यांच्यात बैठक झाली असून, यावर उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

राष्ट्रीय व राज्य महामार्गावर झालेल्या अपघातांमध्ये जिल्ह्यातील अपघातांचे प्रमाण हे राज्यात अधिक आहे. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पोलिस प्रशासनास आवश्‍यक त्या सूचना दिल्या. यातच शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील अपघात होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.

जानेवारी २०१९ ते मे २०२२ या साडेतीन वर्षाच्या कालावधीत शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून जात असलेल्या मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग तीनवर २७२ अपघात झालेले आहे. यात ११२ अपघातांमध्ये नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १२८ तर ३२ किरकोळ स्वरूपाचे अपघात आहे.

यामुळे शहर पोलिस आयुक्तालय हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरदेखील अपघात कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण आणि पोलिस महासंचालक यांच्यात एक बैठक झाली आहे. बैठकीत उपाययोजना करत त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT