hijab row woman s gathering in support of hijab in malegaon tomorrow Hijab Day will be observed  
महाराष्ट्र बातम्या

Hijab Row : हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद; मालेगावात उद्या हिजाब दिवस

सकाळ डिजिटल टीम

कर्नाटकात सुरु असलेल्या हिजाब (Hijab Row) प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात पाहायाला मिळत आहेत, आज नाशिक जिल्ह्यातील मालेगावात(Malegaon) जमियत उलेमा ए हिंदतर्फे येथील अजिज कल्लु स्टेडिअमच्या आवारात हिजाबचे समर्थन करण्यासाठी तसेच कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ महिला मेळावा आयोजित करण्यात आला. तर पुण्यात राष्ट्रवादी (NCP) पक्षाकडून भाजपविरोधात आंदोलन तसेच तर हिंदू महासभेतर्फे भगवे वस्त्र परिधान करून रॅली काढण्यात आली.

शरियतमध्ये महिला-पुरुषांना समान न्याय दिला आहे. शर्म, हया महिलांचा स्थायी स्वभाव आहे. हिजाब-बुरखा व पडदा तसेच स्त्री-पुरुषांनी अंगभर कपडे परिधान करणे शरियामध्ये बंधनकारक आहे. यामुळेच डोक्यावर टोपी, रुमाल किंवा साफा-फेटा बांधूनच नमाज पठण होते. महिलांच्या इज्जत व अब्रुच्या रक्षणासाठी पुरुष प्राण पणाला लावण्यास तयार असतो. याची जाणीव असताना कर्नाटक राज्यात महाविद्यालयातील ड्रेस कोड निषेधार्ह आहे. महिलांना हिजाब-बुरखा गरजेचा आहे असे प्रतिपादन आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी मालेगावात बोलताना केले. जमियत उलेमा ए हिंदतर्फे येथील अजिज कल्लु स्टेडिअमच्या आवारात हिजाबचे समर्थन करण्यासाठी, कर्नाटक शासनाच्या निषेधार्थ झालेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते.

हजारो महिलांचा सहभाग

मालेगावातील महिला मेळाव्यात हजारोच्या संख्येने महिला हिजाब-बुरखा परिधान करुन सहभागी झाल्या होत्या. कर्नाटक राज्यात सत्ताधारी भाजपने महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी ड्रेसकोड करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या विरोधात कर्नाटकात आंदोलन सुरु आहे. nया निर्णयामुळे विद्यार्थीनींना बुरखा-हिजाब घालण्यास प्रतिबंध असल्याने शहरात त्याविषयी मोठा रोष आहे.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा फुले वाड्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काही महिलांनी देशातील विविध महिला परंपरांच्या वेशभूषा केल्या होत्या. तर हिंदू महासभेच्या महिलांनी भगवे वस्त्र घालून कसबा गणपती ते लाल महाल या परिसरात रॅली काढली. तसेच मुस्लिम महिलांकडून जर हिजाब चे समर्थन होत असेल आम्ही देखील भगवे उपरणे घालून मुलांना शाळेत पाठवू असे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले.

मालेगावात उद्या हिजाब दिवस (Hijab Day in Malegaon)

कर्नाटकमधील आंदोलनाला पाठींबा व भाजप शासनाचा निर्णय रद्द करावा यासाठी हा महिला मेळावा झाला. उद्या (ता.११) हिजाब दिवस पाळण्याचा निर्णय जमियत उलेमा ए हिंदने घेतला आहे. त्याची पुर्व तयारी व महिलांना शरिया कानून हिजाबचे महत्व विषद करण्यासाठी आजचा महिला मेळावा झाला. यात शहरातील पुर्व भागातील विविध प्रभागातून शेकडोच्या जत्थ्याने येऊन महिला सहभागी झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT