Hindustani Bhau Participate in student Agitation
Hindustani Bhau Participate in student Agitation e sakal
महाराष्ट्र

मुंबई : १०, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंदुस्थानी भाऊ सहभागी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी आज विद्यार्थी अचानक रस्त्यावर उतरले. नागपूर (Nagpur), मुंबई (Mumbai), अकोला (Akola) आणि पुण्यात (Pune) शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन (10th 12th Student agitation) केलं. हिंदुस्थानी भाऊ नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं. हाच हिंदुस्थानी भाऊ आंदोलनामध्ये सहभागी झालेला दिसला.

विद्यार्थ्यांचे शुल्क माफ व्हावे. त्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आम्ही शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देणार आहोत. पोलिस हे निवेदन वर्षा गायकवाड यांना पोहोचवणार आहे, असा दावा हिंदुस्थानी भाऊनं फेसबुक लाईव्हवरून केला आहे. इशारा देऊनही सरकारने परीक्षा रद्द केल्या नाहीतर विद्यार्थी आणखी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देखील त्यानं दिला आहे.

मुंबईत धारावी परिसरात हजारो विद्यार्थी एकत्र झाले होते. या परिसरात विद्यार्थ्यांनी हुल्लडबाजी केली. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला. हिंदुस्थानी भाऊच्या सांगण्यावरून हे करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबई पोलिस त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहेत. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याची तयारी केली आहे.

हिंदुस्थानी भाऊनं व्हिडिओत काय म्हटलं? -

दोन वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब अजून सावरलेलं नाही. आता ओमिक्रॉन आला आहे. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊनं त्याच्या व्हिडिओमधून केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : साताऱ्यात आज दिग्गजांच्या तोफा धडाडणार; शरद पवार, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात प्रचार सभा

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 04 मे 2024

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

SCROLL FOR NEXT