History Sakal
महाराष्ट्र बातम्या

असा झाला 'लावणी'चा जन्म; जाणून घ्या इतिहास

लावणीला अनेक वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे.

सुरज सकुंडे

History of Lavani: लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान...या लावणीच्या माध्यमातून अनेक अदाकारांनी भल्याभल्यांना पायातील घुंगराच्या तालावर नाचवलं आहे. तमाशाचा फडापासून ते ऑक्रेस्ट्राच्या स्टेजपर्यंत, शाळेतल्या गॅदरिंगपासून ते चित्रपटांपर्यंत, कुठेही लावणी सुरु झाली की, महाराष्ट्रातील मराठी माणूस वेडा झालाच म्हणून समजा. गेल्या कित्येक वर्षांपासून लावणी महाराष्ट्रातील लोकांचं मनोरंजन करत आली आहे. अलीकडच्या काळात लावणी देशातच नाही तर परदेशातही पोहोचली आहे. विदेशातील अनेक नृत्यांगणा महाराष्ट्रात येऊन लावणी शिकतात, तिचा अभ्यास करतात. काळानुसार लावणी बदलत गेली. समृद्ध होत गेली. अलीकडच्या काळात तर लावणी थेट डिजेवर सुद्धा वाजत आहे. पण लावणीची सुरुवात नेमकी कधी झाली? तिचा इतिहास काय आहे? हे तुम्हाला माहिती आहे का?

‘लावणी’ म्हणजे काय? (What is Lavani?)-

लोकांच्या मनोरंजनासाठी नृत्य, संगीत आणि अभिनय यांच्या संयोगातून सादर केला जाणारा एक कलाविष्कार म्हणजे लावणी असं लावणीचं वर्णन करता येईल. लावणीच्या विविध प्रकारांनुसार तिचं सादरीकरण केलं जातं.

असा झाला लावणीचा जन्म (History of Lavani)-

लावणीमध्ये कालपरत्वे अनेक बदल होत गेले. लावणीची बदलती रूपे आणि स्थल, काल व लोकसमूह यांच्या अपेक्षेने तिचे सिद्ध झालेले प्रकार यांची तुलना करता लावणीचा

पूर्वी घरदार सोडून मोहिमांवर गेलेल्या सैनिकांना रमविण्यासाठी काहीशी भडक व उथळ गाणी रचली जात. सौंदर्यवती महिला त्यावर थिरकत असत. तसेच उत्सव, यात्रा, कार्याक्रम इत्यादी ठिकाणी अशा प्रकारची गाणी होत. अशा गरजांमधून मराठी भाषेत लावणीचा जन्म झाला.

सर्वात जुनी लावणी (Oldest Lavani)-

महाराष्ट्रात शतकानुशतके लावणी होत आहेत. वीरशैव संत शाहीर मन्मथ स्वामी यांनी सोळाव्या शतकात रचलेली लावणी पहिली उपलब्ध लावणी मानली जाते. परंतु ही लावणी श्रृंगारसानं नाही तर तर भक्तीरसानं युक्त लावणी आहे. म्हणजेच ही आध्यात्मिक लावणी असून शिलाहारांची कुलदेवता महालक्ष्मी कराडात कशी आली, याचे वर्णन करण्यात आलं आहे.

अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्धात लावणीची भरभराट खऱ्या अर्थाने भरभराट झाली. उत्तर पेशवाईच्या काळात शाहीर रामजोशी, होनाजी बाळा, परशराम, सगनभाऊ, अनंत फंदी आणि प्रभाकर हे प्रसिद्ध लावणीकार शाहीर होते.

रामजोशीने संस्कृतसह अनेक भाषांत लावण्या रचल्या. इंग्रजी अमदानीत पट्ठे बापूराव, शाहीर हैबती, लहरी हैदर इ. अनेकांची नावे घेता येतात. आधुनिक काळात ग. दि. माडगूळकर, कवी संजीव, पी. सावळाराम, जगदीश खेबुडकर इ. गीतकारांचे लक्ष लावणीकडे वेधले गेलं.

Rupali Bhosle

शृंगार, अध्यात्म, सामाजिक वास्तव याचे भान म्हणजे लावणी (Subject of Lavani)-

अलीकडे आपण लावणीमध्ये स्त्री-पुरुष संबंध तसेच शृंगाराच्या विविध गोष्टी लावणीमध्ये पाहतो. परंतु लावणी यापूरती मर्यादीत नाही पौराणिक, आध्यात्मिक आणि इतर अनेक विषयांवरही लावणीची रचना झालेली दिसते.

यामधूनच कुठं कुठं जायाचं हनीमुनला, चला जेजुरीला जाऊ, पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची या दोन लावण्यांमध्ये अनुक्रमे श्रृंगार, अध्यात्म, सामाजिक वास्तव विषय हाताळले गेले आहेत.

काही भेदिक लावण्यांमध्ये कोडी-उखाणेही आढळतात. यामध्ये कलगी व तुरा हे दोन पक्ष असतात. रामजोशीने दुष्काळावर लावणी रचावी, वा अनंत फंदीने बदलत्या काळाविषयी खंत व्यक्त करावी, यावरून लावणीच्या विषयांचा आवाका किती मोठा आहे, ह्याची कल्पना येते.

लावणीचे प्रकार (Types of Lavani)-

सर्वसाधारणतः ढोलकी, हलगी, तुणतुणे, झांज ही वाद्ये लावणीगायनात वापरली जातात. सादरीकरणाच्या दृष्टीने पाहता लावणीचे तीन प्रकार मानता येतील. शाहिरी लावणी, बैठकीची लावणी आणि फडाची लावणी हे ते तीन प्रकार होय.

1. शाहिरी लावणीमध्ये डफ-तुणतुण्याच्या साथीने गाणी गायली जातात. उच्च स्वराने साथ करणारे झीलकरी संचामध्ये असतात.

2. बैठकीची लावणी गायिका-नर्तिका बैठकीमध्ये सादर करतात. तबला, पेटी, सारंगी, तंबुरी इत्यादी वाद्यांची साथ असते. नृत्य, गायन आणि दिलखेच अदा हे बैठकीच्या लावणीचे वैशिष्ट्य आहे.

3. फडाची लावणी हा सर्वज्ञात प्रकार आहे. उत्कृष्ट नृत्यांगणा, त्यांची अदा यासोबतीला नाच्या, सोंगाड्या इ. कलाकारांची साथ हे या लावणीचं वैशिष्ट्य.

sangli

लावणीसाठी सरकारही प्रयत्नशील (Maharashtra Government Steps for Lavani)-

लावणी ही केवळ मनोरंजन राहिलेली नाही. आज अनेक कलाकारांचं पोट या लावणीमुळं भरत आहे. परंतु तरीही अलीकडच्या काळात शृंगाराच्या अतिरेकामुळे लावणीची वैचारिक खोली कुठेतरी हरवली आहे, हे तितकंच सत्य. लावणी सुसंस्कृत समाजातील आपलं स्थान आणि लोकप्रियता घालवून बसली आहे. लावणी आणि ती सादर करणाऱ्या अशिक्षित तमाशा कलाकारांना समाजाला सजग करण्याचे प्रयत्न आज महाराष्ट्र सरकार तमाशाशिबिरे, महोत्सव आदींचे आयोजन करून करीत आहे. पारंपरिक रीतीने लावणीपरंपरा जोपासणाऱ्या कलावंतांना राज्य पुरस्कार देण्याची प्रथाही चालू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT