Girish mahajan vs Eknath Khadse  esakal
महाराष्ट्र बातम्या

Eknath Khadse : शरद पवारांना घट्ट पकडून राहा, इकडं येण्यासाठी हातपाय जोडू नका; महाजनांचा खडसेंना टोला

रवींद्र देशमुख

जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पूर्वाश्रमीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपनेते गिरीश महाजन यांच्यातील टीका टीप्पणी मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. खडसे यांनी नुकतीच महाजन यांच्यावर कडाडून टीका केली होती. त्याला महाजन यांनी आज प्रत्युत्तर दिलं.

महाजन म्हणाले की, एकनाथ खडसे यांनी आमची काळजी करू नये. त्यांच्या राष्ट्रवादीमधील बचे कूचे जे लोक आहेत ते सुद्धा आता आमच्याकडे येत आहे. आता तुम्ही शरद पवार यांना घट्ट पकडून राहा. इकडे परत यासाठी पुन्हा हातपाय जोडू नका, अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान अजितदादा यांच्याबरोबर येण्यासाठी तुम्ही काय करत आहेत, याची कल्पना आम्हाला तसेच अजित पवार यांना सुद्धा आहे. आमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करू नका, असं महाजन म्हणाले.

शरद पवारांकडून प्रफुल्ल पटेलांबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे दरवाजे बंद झालेत, असं शरद पवार यांनी म्हटले. यावरून मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार यांना उलट टोला लगावला आहे. त्यांनी कधी सांगितलं तुम्हाला दरवाजे उघडा. उलट आता तुम्ही तुमचे दरवाजे बंद करा. कारण तुमच्याकडचे जे दोन चार लोक शिल्लक आहेत तेही अजित पवारांकडे यायला लागली आहेत, असंही महाजन यांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT