Holiday Calendar 2023  esakal
महाराष्ट्र बातम्या

Holiday Calendar 2023 : पुढचं वर्ष खाणार सगळ्या सुट्ट्या; वीकेंडलाच आले आहेत सगळे सण

त्यामुळे लॉन्ग वीकेंडच्या सुट्ट्या विसरणच बरं

सकाळ डिजिटल टीम

Holiday Calendar 2023 : नवीन वर्षाच कॅलेंडर बघायचा पहिलं कारण असतं या वर्षी नक्की कुठे आणि किती सुट्ट्या मिळणार आहेत हे तपासणं. अनेकांना सवय असते की पुढच्या वर्षीच कॅलेंडर उघडून त्यात तारखा बघून सण आणि रविवार असं एकत्रित समीकरण करत फिरायला जायच प्लॅनिंग करायच. पण यावर्षी दुर्दैवाने असं काहीही होणार नाहीये, कारण सगळ्याच सुट्ट्या ह्या रविवारात मर्ज झाल्या आहेत. त्यामुळे लॉन्ग वीकेंडच्या सुट्ट्या विसरणच बरं आहे.

न्यू ईयर

पहिली सुट्टी इथेच गेली, यावर्षी 1 जानेवारी रविवारी असल्याने, नवीन वर्षाची पहिली सुट्टीच गेली आहे. चुकून 1 जानेवारी शुक्रवारी किंवा शनिवारी आला तर सुट्ट्यांच काहीच टेंशन नसायच.

मकर संक्रांती

मकर संक्रांती किंवा पोंगल हा भारतातला मोठा सण आहे, अनेकांना त्याची सुट्टीही असते. पण यावेळी हा सण शनिवारी आहे. त्यामुळे संक्रांतीची सुट्टी वेगळी मिळणार नाही.

महाशिवरात्री आणि शिवजयंती

2023 मध्ये 18 मार्चला महाशिवरात्री आहे आणि हाही उत्सव शनिवारी आहे, लोकांना शिवरात्रीची वेगळी सुट्टी मिळणार नाही. शिवाय शिवजयंती 19 मार्चला साजरी केली जाते, तशी नेहमीच त्याला सुट्टी असते पण आता त्या दिवशी रविवार असल्यामुळे सुट्टी मिळणार नाही.

ईद-उल-फितर

ईदची सुट्टी चंद्रावर अवलंबून असली तरी यावेळी ईद २२ एप्रिलला आहे असं असेल तर त्या दिवशीही शनिवार आहे त्यामुळे ईद पुढे गेली तरी रविवारीच शिफ्ट होईल आणि ही सुट्टीही वायाला जाणार आहे.

गणेश चतुर्थी

गणेश चतुर्थी आणि सुट्टी नाही असं होणं अशक्य आहे पण यावेळेस चतुर्थीही रविवारी आल्याने हीही सुट्टी गेली आहे.

दुर्गाष्टमी

दुर्गाष्टमीची गोष्ट गणेश चतुर्थीसारखीच आहे. यावेळी 22 ऑक्टोबरला दुर्गाष्टमी असून त्यादिवशी रविवार आहे. त्यामुळे ही सुट्टीही गेली आहे.

दिवाळी

यावेळी दिवाळीही रविवारी आहे. यंदाची दिवाळी १२ नोव्हेंबरला साजरी होणार असून हा दिवस रविवार आहे. यामुळे दिवाळीच्या आठवड्यात एकापेक्षा जास्त सुट्ट्या घेणं कठीण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bike Taxi: अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाई करा, परिवहन मंत्र्याचे सायबर क्राईम विभागाकडे मागणी

BAN vs PAK 1st Test : बांगलादेशने घरी बोलवून पाकिस्तानला ठेचले; WTC मध्ये नाचक्की, शाहीन आफ्रिदीच्या संघाचा लाजीरवाणा पराभव

Kalyan Crime News : कल्याण हादरलं! 78 वर्षीय नराधम भोंदूबाबाचा 15 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; पूजेच्या बहाण्यानं केलं काळं कृत्य

Mohol Accident : ईरटीगा कार आणि मालट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : नाशिक TCS प्रकरण; आरोपी तौसीफ अत्तारला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT