dilip walse patil esakal
महाराष्ट्र बातम्या

परमबीर सिंग बेपत्ता, गृहमंत्र्यांनी बोलवली महत्त्वाची बैठक

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) अटक होण्याच्या भितीनं देश सोडून परदेशात गेले असावेत, असा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. कोणत्याही अधिराऱ्याला भारत सरकारच्या परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येत नाही. त्यांना गृहमंत्रालय शोधत आहे. कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होणार, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे (home minister Dilip Walse Patil) पाटील यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणी आता गृहमंत्री यांनी सकाळी (ता.१) प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर वळसे पाटील यांची मुंबई आणि ठाणे पोलिस आयुक्त यांच्यासोबत बैठक होणार आहे..

अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले?

अँटीलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करत असलेल्या एनआयएनं परमबीर सिंह यांचा चौकशीसाठी अनेकदा समन्स जारी केलं आहे. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत ते प्राप्त झालेलं नाही. एनआयए (NIA) आणि महाराष्ट्र राज्यातील चौकशी एजन्सींना संशय आहे की, ते अटकेच्या भीतीनं देश सोडून पळाले आहेत. परमबवीर सिंग प्रकरणात राज्य सराकरने नोंदविलेले गुन्हे संदर्भात माहिती आणि पुढील कारवाई यांची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

वळसे पाटील यांनी दोन्ही पोलीस आयुक्तांना बोलवल्याचे समजते. मुंबई पोलिस आयु्कत हेमंत नगराळे तसेच ठाणे पोलिस आयु्कत जयजित सिंग यांना बोलवले असून परमबीर सिंह प्रकरणी चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास यंत्रणांना संशय आहे की, परमबीर सिंह युरोपातील देशात लपले असावेत. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा अद्याप यंत्रणांना मिळालेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT