Maharashtra Din
Maharashtra Din  sakal
महाराष्ट्र

Maharashtra Din : दादरच्या 'या' छोट्या चाळीत रुजली शिवसेनेची बीजं

निकिता जंगले

Maharashtra Din : आज १ मे म्हणजे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र हे मराठी माणसांचं अस्तित्व असलेलं राज्य. महाराष्ट्राच्या इतिहासात मराठी माणसाचा संघर्ष कायमच दिसून आला. मराठी माणसांची लढाई ही खूप मोठी आहे. मुंबई सारख्या ठिकाणी अन्य राज्यातील लोकांचे वर्चस्व आणि त्यात मराठी माणूस मागे पडत होता.

स्वत:च्या राज्यात स्वत:च्या अस्तित्वासाठी मराठी माणूस लढत होता पण एक वेळ अशी आली की महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हितासाठी काम करणारी संघटना आली आणि मराठी माणसाला न्याय मिळत गेला. ती संघटना म्हणजे शिवसेना. आज आपण शिवसेनेचा कसा जन्म झाला? याविषयी जाणून घेणार आहोत. (how shiv sena born in Miranda chawl dadar mumbai by Prabodhankar Thackeray )

महाराष्ट्राचे विचारविश्व समृद्ध करणारे, येथील समाजाला पुरोगामी दिशा देणारे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे नाव सर्वांनाच माहिती आहे. या नावामुळेच शिवसेनेसारख्या संघटनेचा जन्म झाला. जरी लोक त्यांना बाळासाहेब ठाकरे यांच्या वडिल म्हणून ओळखत असले तरी आपल्या विचाराने महाराष्ट्राला आत्मभान देणारे बहूजनवादी विचारवंत हा त्यांचा खरा परीचय आहे. त्यामुळेच त्यांना प्रबोधनकार ही उपाधी मिळाली.

प्रबोधनकार केशव ठाकरे मिरांडा चाळीत राहायचे. याच चाळीत ते प्रबोधन जन्माला आले.येथेच प्रबोधनकारांचे अनेक ग्रंथ रचले गेले. येथूनच विविध बहुजनवादी लढाया सुरू झाल्या. फार काय, तर येथेच शिवसेना या अस्सल महाराष्ट्रीय संघटनेचे बीज रोवले गेले.

प्रबोधनकार मिरांडा चाळीत राहत असतानाच दाक्षिणात्यांचा रोजगाराच्या बाजारातील प्रभाव त्यांच्या लक्षात आला होता. दक्षिणेतून मोठ्या संख्येने मुंबईत येणाऱ्या नोकरदार, मजूर यांच्यामुळे येथील रोजाचे सरासरी दर पडले होते. त्याचा फटका मराठी माणसांना बसत होता. प्रबोधनकार त्याविरोधात आपल्या नियतकालिकातून आवाज उठवत होते.

मराठी माणसांच्या हितासाठी काम करणारी एक संघटना असावी, असा विचार त्यातूनच आला. तोच शिवसेनेच्या जन्माचा विचार होता आणि तेथूनच शिवसेना जन्माला आली. आजही दादरमध्ये उभ्या असलेल्या मिरांडा चाळीला कदाचित आपल्या या मोठेपणाचे स्मरण नसेल पण ही चाळीच शिवसेनेच्या जन्माला आणण्यास कारणीभूत ठरली.

संदर्भ - चाळींतले टॉवर ( म्हाडा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

Appi Aamchi Collector: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराज केंद्रेची 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Jayant Patil : मोदी सरकारबद्दल सामान्य माणूस, शेतकरी, युवक व महिलांच्यासह समाजाच्या सर्व घटकात प्रचंड चीड; जयंत पाटील

Team India squad T20 WC : सूर्यकुमार, बुमरावर भारताचे भवितव्य! टी-20 वर्ल्ड कपबाबत युवराज सिंगचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT