landslide google
महाराष्ट्र बातम्या

पावसाळ्यातील दरड दुर्घटनांपासून स्वत:चा जीव कसा वाचवाल ?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख डॉ. सतीश ठिगळे यांनी 'न्यूटन जागवा, दरडी थोपवा' अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत ते दरड साक्षरता मोहीम राबवत आहेत.

डॉ. सतीश ठिगळे

मुंबई : दरडी अचानक कोसळत नाहीत. त्या कोसळण्याची शक्यता दर्शवणारी अनेक लक्षणे म्हणजेच निसर्ग देत असलेला धोक्याचा इशाराच ! अशी लक्षणे दरड कोसळण्याच्या काही वर्षे, काही महिने, काही दिवस एवढंच नाही तर काही तास आधीही स्पष्ट दिसू लागतात. ती दिसू लागताच गावकऱ्यांनी दुर्घटना टाळण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी सज्ज व्हायला पाहिजे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे निवृत्त विभाग प्रमुख डॉ. सतीश ठिगळे यांनी 'न्यूटन जागवा, दरडी थोपवा' अभियान सुरू केले आहे. याअंतर्गत ते दरड साक्षरता मोहीम राबवत आहेत.

दरडींची लक्षणे

१. डोंगर उतारांना तडे जाणे व तडे गेलेला भाग खचू लागणे, घरांच्या भिंतींना भेगा पडून पडझड होणे, झाडे, विद्युत खांब, कुंपणे कलणे.

२. नवीन झरे निर्माण होणे, जुने झरे रुंदावणे, त्यांच्यातून मोठ्या प्रमाणात गढूळ पाणी बाहेर येणे.

३. विहिरींतल्या भूजल पातळीमध्ये अचानक वाढ किंवा घट होणे.

का उद्भवतात ही लक्षणे ?

नैसर्गिक कारणे

१. सह्याद्री परिसर हा पर्वतमय, भूकंप्रवण व भरपूर पर्जन्यवृष्टीचा प्रदेश.

२. भूकंपामुळे आणि अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरील माती आणि मुरूमाच्या सच्छिद्र भूपृष्ठाला तडे जातात.

३. या तड्यांमध्ये पावसाचे पाणी मुरून पायथ्याशी झरे निर्माण होतात.

४. अखेरीस अतिवृष्टी दरम्यान अशा तड्यांपासून दरडी कोसळतात.

मानवनिर्मित कारणे

पर्वतराजीत नवीन रस्ते, लोहमार्ग खोदताना, बोगदे खणताना, जुने रस्ते रूंद करताना, खाणकामासाठी उडणाऱ्या सुरूंगांमुळे, तसेच डोंगर उतारांवर शेतीसाठी, शेततळ्यांसाठी, घरे बांधण्यासाठी सपाटीकरणामुळे, चर खणल्यामुळे तसेच जंगलतोडीमुळे डोंगरउतार धोकादायक होऊ लागतात. अशा मानवी अतिक्रमणामुळे अतिवृष्टीदरम्यान दरडी कोसळतात. त्यामुळे डोंगर उतारांवर मानवी अतिक्रमण करू नये.

दरडींची निर्णायक क्षणी उद्भवणारी लक्षणे

१९८९ साली भाजे येथे ३८, २००५ साली महाड परिसरात कोडीवते, रोहन, दासगाव, जुई, येथे १९८, २०१४ साली माळीण येथे १५०, तर अलीकडे २०२१ मध्ये तळीये, पोसरे, ढोकावळे, आंबेघर, मिरगाव या ठिकाणी दरडी कोसळून १३० व्यक्ती ठार झाल्या. तेथे स्मारके उभी राहिली.

या सर्व घटना घडण्याच्या निर्णायक क्षणी धोक्याची लक्षणे उमटली होती.

*अतिवृष्टी होत असताना झऱ्यांची पाणी देण्याची क्षमता वाढली होती. त्यांतून गढूळ पाणी येत होते. झाडे उमळून पडत होती. तारांची कुंपणे, विद्युत खांब उचकटत होते.

*भात खाचरांना भेगा पडत होत्या. जमिनीला हादरे बसत होते आणि संपर्क साधने निकामी झाली होती.

*कोठे घरांना तडे जात होते तर कोठे भिंती कोसळत होत्या. घराघरांमध्ये जमिनीतून पाण्याचे पाझर फुटत होते. घरांच्या फरशा उचकटल्या जात होत्या. संपूर्ण परिसर जलसंपृक्त झाल्यामुळे विहिरी वाहू लागल्या होत्या तर बोअरवेलमधून पाणी उसळत होते.

म्हणून डोंगरवासियांनो,

दरडीची अशी लक्षणे स्पष्ट दिसत असताना कोणत्याही क्षणी अनर्थ घडू शकतो. धोक्यापासून तत्काळ दूर होऊन जीव वाचवला पाहिजे, हा एकमेव विचार मनी बाळगा.

पिढ्यान् पिढ्या नांदत असलेल्या घरापासून दूर कसे जायचे, पावसाळ्यात असं घडणारच, होईल थोड्या वेळात पूर्ववत, असे विचार झटकून टाका. प्रश्न फक्त तुमचा नाही तर तुमच्या कुटुंबाचा, पुढील पिढीच्या जीवन-मरणाचा आहे हे लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी सज्ज व्हा.

पूर्वतयारी म्हणून बँकेची कागदपत्रे, सोने-नाणे, पैसाआडका, औषधे यांची जुळवाजुळव करून ठेवा. प्रथम वृद्ध, आजारी माणसे, लहान मुले आणि जनावरांना हलवण्यास प्राधान्य द्या.

डोंगर उताराच समतोल राखण्यासाठी काय करावे ?

बांबूची लागवड व वनीकरणास प्रोत्साहन देणे, भूजलाचा जलद निचरा करणे, संरक्षक भिंती आणि जाळ्या बसवणे.

क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात. परंतु, त्यांच्या दिशा परस्परविरोधी असतात, हा न्यूटन या शास्त्रज्ञाचा गतीसंबंधीचा तिसरा नियम आहे. डोंगर उतार असमतोल करणारे मानवी अतिक्रमण ही झाली क्रिया आणि त्यामुळे समतोल ढळून दरडी कोसळणे ही निसर्गाची प्रतिक्रिया हे लक्षात घ्या. निसर्गात आपण केलेले बदल म्हणजे 'कुऱ्हाडीचा दांडा, गोतास काळ' हे विसरू नका.

पावसाळ्यात डोंगर उतारांचे निरीक्षण करा

*शिक्षकांच्या मदतीने गावचे नकाशे प्राप्त करून डोंगर उतारावरील धोकदायक दरडींचे नकाशे तुम्ही तयार करू शकता.

*तसेच पूररेषाही आखू शकता.

*गावाच्या पर्यावरणीय समस्यांबाबत पथनाट्य, पोवाडे, इत्यादींद्वारे जनजागृती घडवणे.

*धोकादायक परिसराचे व्हिडिओ चित्रीकरण करून पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांना पाठवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

खरीप हंगामात ८१,००० शेतकऱ्यांना ११४० कोटींचे पीककर्ज! ६३ हजार ८४९ शेतकऱ्यांच्या १०३० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे बॅंकांनी केले नवे-जुने

Latest Marathi News Updates: 'सीएम'पदासाठी भाजपात पक्ष विलिन करण्याची शिंदेंची तयारी - संजय राऊतांचा टोला!

IND vs ENG 3rd Test: रिषभ पंतने २५ मिनिटं नेट्समध्ये फलंदाजी केली, पण...! जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स, Video

Pune ISIS sleeper cell: मोठी बातमी! पुणे ‘इसीस स्लीपर सेल मॉड्युल’ प्रकरणी अकरावी अटक; तीन लाखांचा होता इनाम!

SCROLL FOR NEXT