student Sakal Media
महाराष्ट्र बातम्या

राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द होण्याची शक्यता

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आले. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही २० एप्रिल रोजी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या.

सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आले. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही २० एप्रिल रोजी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र, बारावीच्या परीक्षाबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे जाहीर केले होते.

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी (ता.१) जाहीर करण्यात आला. त्यानंतर आता सर्वाचे लक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेकडे लागले आहे. ‘दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत देशभरात एकच धोरण असावे’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बारावीच्या परीक्षाही रद्द होण्याची चिन्हे आहेत. अर्थात याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती राज्य सरकाने अद्याप दिलेली नाही. (HSC exams are also likely to be canceled after CBSE)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई, आयसीएसईच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आले. त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही २० एप्रिल रोजी दहावीच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र, बारावीच्या परीक्षाबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे जाहीर केले होते. ‘सीबीएसई’ने बारावीच्या परीक्षेबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात निर्णय जाहीर करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे एक जूनला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  

‘दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत देशभर एकच धोरण असावे,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षाही रद्द होण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या अधिकृत घोषणेकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष लागले आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी जवळपास १३ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

'विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्वाची आहे. कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांवरील ताण वाढविणे योग्य ठरणार नाही,' अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा रद्द करताना व्यक्त केली. सीबीएसई बोर्डाचे अध्यक्ष, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, प्रकाश जावडेकर, गृहमंत्री अमित शहा, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय शिक्षा मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

महाराष्ट्रातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Gold Price : महिनाभरात सोने १० हजार रुपयांनी महागले! भाव एक लाख १० हजारांच्या पुढे; जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Pune News : इतिहासाचा मार्गदर्शक तारा अनंतात विलीन; ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT