Unauthorized schools in Maharashtra eSakal
महाराष्ट्र बातम्या

Unauthorized schools : राज्यात अजूनही 378 अनधिकृत शाळा सुरू; शिक्षण विभागाच्या अहवालानंतर कारवाईची प्रतिक्षा!

अनधिकृत शाळांचा मुद्दा विधानसभेत गेला. त्यानंतर अनधिकृत शाळांबाबत काय कारवाई करावी, यासंदर्भातील शिफारशी करणारा अहवाल शालेय शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे.

मीनाक्षी गुरव : सकाळ वृत्तसेवा

Unauthorized schools in Maharashtra : राज्यात एकूण ६६१ शाळा बेकायदा असल्याची माहिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. मात्र, कारवाईनंतर अद्यापही ३७८ शाळा सुरू आहेत. अनधिकृत शाळांचा मुद्दा विधानसभेत गेला. त्यानंतर अनधिकृत शाळांबाबत काय कारवाई करावी, यासंदर्भातील शिफारशी करणारा अहवाल शालेय शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे पाठविला आहे. आता अनधिकृत शाळांवर कारवाईसंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे शिक्षण विभागासह सर्वांचे लक्ष लागले आहे.

सद्यःस्थितीत राज्यातील खासगी व्यवस्थापनाद्वारे ६६१ शाळा अनधिकृतपणे सुरू असल्याचे यापूर्वीच निदर्शनास आले. त्यापैकी ७८ शाळा बंद करून या शाळांमधील सहा हजार ३०८ विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महापालिका परिक्षेत्रातील एकूण १८६ अनधिकृत शाळांपैकी १४ शाळा बंद केल्या असून उर्वरित १७२ शाळांची तपासणी सुरू आहे.

या अनुषंगाने जून-जुलै २०२३ मध्ये अनधिकृत शाळांच्या संदर्भातील संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना नोटिसा पाठविल्या आहेत. दरम्यान, २०१२ पूर्वीच्या अनधिकृत शाळांना ‘स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियम २०१२’मधील तरतुदींमध्ये शिथिलता देऊन शाळा नियमित करण्याच्या अनुषंगाने राज्य सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागाला अहवाल देण्यास सांगितले होते.

राज्यात कुठे किती अनधिकृत शाळा?

राज्यात मुंबई विभागात अनधिकृत शाळांची संख्या सर्वात जास्त आहे. याठिकाणी 451 अनधिकृत शाळा होत्या, त्यातील मान्यता नसणाऱ्या शाळांची संख्या 423 होती. यांपैकी 24 शाळांवर कारवाई करण्यात आली असून, 347 शाळा अजूनही अनधिकृतपणे सुरू आहेत.

पुणे विभागातील अनधिकृत शाळांची संख्या 33 होती, त्यातील 27 शाळा मान्यता नसणाऱ्या होत्या. यातील आठ शाळांवर कारवाई झालेली असून, 14 शाळा अजूनही सुरू आहेत.

याव्यतिरिक्त नाशिक विभागात 21, कोल्हापूर विभागात 24, औरंगाबाद विभागात 34, लातूर विभागात 21, अमरावती विभागात 17 आणि नागपूर विभागात 60 अनधिकृत शाळा होत्या. यांपैकी कोल्हापुरातील 3, औरंगाबादमधील 8 आणि नागपूर विभागातील 21 शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. सध्या कोल्हापूर विभागात एक आणि नागपूर विभागात सात अनधिकृत शाळा सुरू आहेत.

मदरसा आणि मुक्त विद्यापीठ शाळांची संख्या 160 असल्याचंही यात म्हटलं आहे. तर काही शाळांबाबत न्यायलयीन प्रकरणे सुरू असल्याचं यात सांगितलं आहे.

त्यानुसार बेकायदा शाळांबाबत काय कारवाई करावी, यासंदर्भातील अहवाल शिक्षण विभागाने पाठविला. अनधिकृत शाळांसंदर्भात काय कारवाई करायची, कोणते नियम लावायचे, कोणत्या शाळा बंद करायच्या आणि कोणत्या सुरू ठेवायचा, बंद केलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे समायोजन कसे करायचे, यासंदर्भात शिफारशी करणारा अहवाल शिक्षण विभागाने राज्य सरकारला दिला आहे. याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना विचारले असता, ते म्हणाले,‘‘या अहवालावर राज्य सरकार विचार करत आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रीडा विश्वातील 'शू सायन्स': खेळाडूंच्या बुटांचे तळवे प्रत्येक खेळानुसार का बदलतात ? जाणून घ्या त्यामागचं विज्ञान!

अखेर सुभेदाराच्या घरात प्रियाची एंट्री झालीच! सगळ्यांसमोर अर्जुन ठरणार खोटा, प्रोमो पाहून प्रेक्षक मात्र वैतागले

NEET-UG पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल; १७ वर्षीय विद्यार्थ्यानं सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं

Women T20 World Cup: T20 वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम INDIA ची एन्ट्री पक्की? फक्त 'या' ३ गोष्टी आणि इतिहास घडणार!

Viral Video: ''सगळ्यांना पप्पा आहेत.. मम्मी म्हणत होती दारु पिऊ नका, पण तुम्ही ऐकलं नाही'', वडिलांच्या फोटोसमोर चिमुकलीची नाराजी

SCROLL FOR NEXT