family planing esakal
महाराष्ट्र बातम्या

पती-पत्नींचे ‘हम दो हमारे तीन’लाही प्राधान्य; २० महिन्यांत २ व ३ अपत्यानंतर १५ हजारांहून अधिक पती- पत्नींनी केली कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया

महागाई, बेरोजगारी अशी सामाजिक कारणे व पालकांचे शिक्षण, जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याने पालक आता स्वत:हून कुटुंब नियोजनासाठी पुढाकार घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल १५ हजारांहून अधिक पालकांनी २० महिन्यांत २- ३ मुलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : देशाची लोकसंख्या १४० कोटींपर्यंत पोचली असून राज्याचीही लोकसंख्या १५ कोटींवर पोचली आहे. महागाई, बेरोजगारी अशी सामाजिक कारणे व पालकांचे शिक्षण, जमिनीचे क्षेत्र कमी झाल्याने पालक आता स्वत:हून कुटुंब नियोजनासाठी पुढाकार घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २१ हजारांहून अधिक पालकांनी मागील २० महिन्यांत दोन-तीन मुलांवरच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. त्यात दोन मुलांवर सर्वाधिक तर दुसऱ्या क्रमांकावर तीन मुलांवर शस्त्रक्रिया करणाऱ्या कुटुंबांची संख्या आहे.

सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ५० लाखांवर पोचली असून एप्रिल २०२२ ते नोव्हेंबर २०२३ या काळात जिल्ह्यात जवळपास ६० हजार प्रसूती झाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे त्यातील ४६ टक्के प्रसूती शासकीय रुग्णालयांमध्ये झाल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील २७ हजार पालकांनी २० महिन्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली आहे.

आरोग्य विभागानेही त्यासाठी त्या पालकांचे समुपदेशन केले आहे. यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात १० हजार ४२५ पालकांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे. त्यात सहा हजार ४४२ पालकांनी दोन अपत्यानंतर थांबण्याचा निर्णय घेतला असून तीन अपत्यांवर थांबलेल्या पालकांची संख्या तीन हजार १४५ आहे. मागील वर्षी एक व दोन अपत्यांवर थांबलेल्या पालकांची संख्या १३ हजार ५५ आहे. तर २० महिन्यात जवळपास ४७० पालकांनीच ‘हम दो हमारा एक’ म्हणत कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे.

...तर कुटुंब नियोजनानंतर मिळते भरपाई

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेनंतर उद्‌भवणाऱ्या समस्येसाठी (असफलता, गुंतागुंत, मृत्यू) ३० हजार ते दोन लाखांपर्यंत भरपाई मिळते. रूग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर किंवा डिस्जार्चनंतर सात दिवसांच्या आत मृत्यू झाल्यास दोन लाखांची भरपाई मिळते. तर ८ ते ३० दिवसांत मृत्यू झाल्यास ५० हजार रुपये आणि शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यास ३० हजारांची भरपाई मिळते. काही गुंतागुंत झाल्यास ६० दिवसांच्या आत २५ हजारांची भरपाई दिली जाते.

२० महिन्यांत २६,९१५ पालकांनी केले कुटुंब नियोजन

बीपीएल, एससी, एसटी संवर्गातील महिलांनी नसबंदी केल्यानंतर आरोग्य विभागाकडून ६०० रुपये दिले जातात. दारिद्र्य रेषेखालील महिलांना २५० रुपये तर पुरुषांना नसबंदीनंतर १४५१ रुपये मिळतात. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, बार्शी, सांगोला व माढा या तालुक्यांमध्ये ‘हम दो हमारे दो’ची संख्या सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाकडील आकडेवारीवरून दिसते. मागील २० महिन्यांत जिल्ह्यातील २६ हजार ९१५ पालकांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली आहे. त्यात ‘हम दो हमारे दो’ आणि ‘हम दो हमारे तीन’ म्हणत शस्त्रक्रिया करणारे पालक सर्वाधिक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : कात्रज उद्यानातील ऑनलाईन बुकिंगला प्रतिसाद; दोन वर्षांत ५ लाख ४४ हजार ६३ पर्यटकांकडून ऑनलाईन बुकिंग!

Oral Cancer Risk Prediction: जनुकांद्वारे समजेल कुणाला तोंडाच्या कर्करोगाचा धाेका; टाटा मेमोरियल सेंटर व ‘अ‍ॅक्ट्रेक’चे संशोधन

Khadakwasla Theft : खडकवासला सोसायटीतील चार बंद सदनिका फोडल्या; ४ अज्ञात चोरट्यांकडून सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास!

Municipal Employee Pay : समाविष्ट गावांतील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात आणि पदावनती; आयुक्तांनी पुनर्विचार आदेश दिला!

Latest Marathi News Live Update : नंदुरबार येथील मतदान केंद्रांवर दोन गटात राडा

SCROLL FOR NEXT