Prasad Purohit_Prasad Lad 
महाराष्ट्र बातम्या

कर्नल प्रसाद पुरोहित यांचा मला अभिमान - प्रसाद लाड

कर्नल प्रसाद पुरोहित हे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असून त्यांच्यावर युएपीए अंतर्गत करावाई करण्यात आली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : कर्नल प्रसाद पुरोहित (Prasad Purohit) हे माझे मित्र असून त्यांच्यावर मला अभिमान आहे, असं विधान भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी केलं आहे. कर्नल पुरोहित हे मालेगाव बॉम्बस्फोटातील प्रमुख आरोपी आहेत. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रसाद पुरोहित यांचा हस्तांदोलन करतानाचा एक व्हिडिओ ट्विट करत केला होता. यावर प्रतिक्रिया देताना लाड यांनी हे विधान केलं आहे. (I am proud of Colonel Prasad Purohit says BJP MLA Prasad Lad)

लाड म्हणाले, "प्रसाद पुरोहित यांच्यावर कोर्टात सुनावणी सुरु आहे. तसेच ते पुन्हा लष्करात कर्नल पदावर रुजू झालेले आहेत. तिथं ते देशसेवा करत आहेत. एखादा माणूस देशसेवेसाठी स्वतःला झोकून देतो तर त्याचा आदर करणं गरजेचं आहे. त्यांच्यावर जो गुन्हा आहे तो अद्याप सिद्ध झालेला नाहीए. जोपर्यंत एखाद्या आरोपीचा आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण त्याला आरोपी म्हणत नाही, असं भारतीय न्यायव्यवस्था सांगते. त्यामुळं मला अशा गोष्टींची चिंता नाही, जे मित्र आहेत ते मित्र आहेत. ज्यावेळी त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध होईल त्यावेळी मी प्रतिक्रिया देईल"

लाड यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, "लाड यांचे मित्र कोण असावेत हा प्रश्न नसून प्रसाद पुरोहित हे युएपीएचे आरोपी असून मालेगाव बॉम्ब स्फोटात त्यांची चौकशी होऊन कोर्टात त्यांचा खटला प्रलंबित आहे. त्यामुळं अशा व्यक्तीसोबतचे घनिष्ट संबंधांवरुन हे दिसतं की, मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी जे जे आरोपी होते त्यांना भाजपनं कायम पाठिंबा दिला आहे. या स्फोटातील आणखी एक आरोपी प्रज्ञा ठाकूर यांना भाजपनं खासदार बनवलं गेलं. प्रसाद पुरोहित यांचा ज्या आरोपांमध्ये सहभाग आहे. त्यावर भाजपचे कसे लागेबांधे आहेत ते वेळोवेळी दिसून आलं आहे. त्यामुळं त्यांच्या या संबंधांवर आम्ही टिप्पणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganesh Visarjan 2025: विसर्जन मिरवणुकीने मोडला रेकॉर्ड, २९ तासांनंतरही सुरू, पोलिसांचे नियोजन कोलमडले

Latest Maharashtra News Live Updates: राजकीय पोळी भाजण्याची काम करणाऱ्या लोकांनी ओबीसी आणि मराठा लोकांचा वापर केला - शिवेंद्रराजे भोसले

Dark Web : एक क्लिक अन् सगळंकाही हॅक! काय आहे डार्क वेब? सुरक्षेसाठी 'हे' एकदा बघाच

'तू स्वतःला काय समजतेस?', बिग बॉस 19'मध्ये फरहाना भट्टवर सलमान खानचा संताप: म्हणाला 'मी तुम्हाला राग आणू का?'

Viral : जागा अपूरी पडली अन् चक्क पुलावर वसवले स्वप्नांतील शहर, जगभरातून पाहायला येतात लोक

SCROLL FOR NEXT