anil deshmukh 
महाराष्ट्र बातम्या

ऑर्थररोड जेलचा भत्ता खावून आलोय, आता कोणी मायचा लाल...; अनिल देशमुखांचं भाजपला आव्हान

रवींद्र देशमुख

नागपूर - महाविकास आघाडीच्या वतीने आज नागपूरमध्ये वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी माजी गृहमंत्रीमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, अजित पवार, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले उपस्थित होते.

अनिल देशमुख म्हणाले की, गृहमंत्री असताना परबीर सिंह यांच्यावर दबाव टाकून १०० कोटी घेण्याचे आरोप करण्यात आले. त्यानंतर माझ्यावर एक वर्षे चौकशी चालली. एक वर्षाच्या तपासानंतर हायकोर्टाने दिलेल्या निकालात सांगितलं की, सर्व आरोप ऐकलेल्या माहितीवर आधारित आहेत. त्यांच्यावरील आरोपांचे पुरावे नाहीत.

माझ्यावर १०० कोटींचा आरोप झाला अन् चार्जशिट १ कोटी ७१ लाखांची दाखल झाली. त्यावेळी कोर्टाने विचारलं याचे तरी पुरावे आहे का? माझ्यावर आरोप करणारा सहा महिने फरार होता. मला केवळ फसवण्यात आलं. १४ महिने मी कारागृहात होतो. तिथला भत्ता खावून मी बाहेर आलोय. आता कोणी मायचा लाल मला मैदानात येण्यापासून रोखू शकत नाही, असं आव्हानच अनिल देशमुख यांनी भाजपला दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 News: अरे त्या, दीपक चहर, शार्दूल ठाकूरला पैसे द्या अन् घरी पाठवा! Mumbai Indians वर दिग्गजाचा पारा चढला; म्हणाले...

Ayan Ahmed: एक सल्ला, नंतर 'तो' मॅसेज अन् सापळा... अयान अहमदनं तरुणींना जाळ्यात कसं ओढलं? पडद्यामागचा सल्लागार लव्हगुरू कोण?

Latest Marathi News Live Update: TSC कंपनीला महिला आयोगाचे सदस्य देणार भेट

KCC Campaign : पशुपालकांसाठी खुशखबर! 'किसान क्रेडिट कार्ड'वर मिळणार ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; राज्य शासनाची विशेष 'KCC' मोहीम

Cricket Viral Video: IPL काय बघताय? इथे तर पठ्ठ्याने मैदानावरच नांगर फिरवला; सामना थेट बंद! खेळाडू, रेफरी अन् प्रेक्षक हैराण

SCROLL FOR NEXT