Sharad Pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

'मला आजपर्यंत कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही'; शरद पवारांचा भगतसिंह कोश्यारींना टोला

धनश्री ओतारी

मी अनेक शपथविधी सोहळ्यात सहभागी झालो. मात्र, मला आजपर्यंत कोणत्याही राज्यपालांनी पेढा भरवला नाही किंवा पुष्पगुच्छ दिले नाही. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना टोला लगावला. (i was never offered sweets by any governor sharad pawar targeted maharashtra governor)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शपथविधी सोहळ्यादरम्यान पेडा भरवतानाचा राज्यपालांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवरुन शरद पवारांनी राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधला आहे.

मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सोहळा टीव्ही वर पाहिला. त्यावेळी दोघांनी पेडा भरवला. आणि पुष्पगुच्छ दिला. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे नेते जेव्हा शपथ घेत होते तेव्हा, मी तिथे उपस्थित होतो. आमच्या एका सदस्याने बाबासाहेब आंबेडकर व इतरांना स्मरण करुन शपथेला सुरुवात केली तर त्यांना याच राज्यपालांनी परत शपथ घ्यायला लावली.

राज्यपालांनी मलाही नियमांनुसारच मला शपथ घेण्यास सांगितले. मात्र, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचा उल्लेख केला. परंतु, राज्यपालांनी त्यावेळी आक्षेप घेतला नाही. अशा शब्दात शरद पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

तसेच, १२ सदस्यावरुनही पवारांनी राज्यपाल कोश्यांरीवर टोलेबाजी केली. आघाडी सरकारने राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे मंत्रीमंडळाचा प्रस्ताव करुन पाठवला होता. मुळात मंत्रीमंडळाने दिलेल्या प्रस्तावाला राज्यपालांनी मान्यता देणे हे बंधनकारक असते असं असताना जवळपास अडीच वर्ष त्यांनी तो प्रस्ताव तसाच ठेवला व कोणताही निर्णय घेतला नाही.

आता राज्यात नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर लवकरच याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. राज्यपालांचा हा निर्णय लोकशाहीला कितपत योग्य आहे याची चर्चा करायची गरज नाही. लोकांना हे सर्व ठाऊक आहे. असे शरद पवार यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT