Sambhaji Raje Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sambhaji Raje: यापुढं मी पुन्हा 'हर हर महादेव'वर भाष्य करणार नाही; आक्रमक संभाजीराजे असं का म्हणाले?

अनेक दिवसांपासून वादात राहिलेला ‘हर हर महादेव’ चित्रपट आज टिव्हीवर प्रदर्शित होत आहे

सकाळ डिजिटल टीम

अनेक दिवसांपासून वादात राहिलेला ‘हर हर महादेव’ चित्रपट आज टिव्हीवर प्रदर्शित होत आहे. याच पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांनी संवाद साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, माझा विरोध निर्मात्याला नाही किंवा दिग्दर्शकालाही नाही. कुणी सिनेमा काढला त्यांनाही नाही. माझा फक्त सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड करण्याला विरोध आहे.

पुढे ते म्हणाले की, सिनेमॅटिक लिबर्टिच्या नावाखाली इतिहासाची मोडतोड केली जाते. चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जातोय त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत चुकीचा इतिहास जाईल. यामुळे कोणताही ऐतिहासिक चित्रपट निर्माण झाल्यानंतर त्याचं स्क्रिनिंग आधी महाराष्ट्रात केलं जावं. त्याचसाठी महाराष्ट्रात इतिहासकारांची समिती स्थापन करावी. त्यानंतर तो दिल्लीच्या सेन्सॉर बोर्डाच्या समितीकडे पाठवावा, अशी मागणी माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी यावेळी बोलताना केली आहे. तर यासंदर्भातील पत्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पाठवणार असल्याचेही संभाजीराजे यांनी सांगितलं आहे.

तर 'हर हर महादेव' चित्रपटाबाबत मी चुकीची भूमिका घेतो आहे असं मला कोणी सांगावं, त्यानंतर मी पुन्हा या चित्रपटावर कधीही भाष्य करणार नाही असंही यावेळी बोलताना संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा 'हर हर महादेव' चित्रपटाबाबतची संभाजीराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट दाखवण्यास माझा विरोध आहे असं त्यांनी स्पष्टपणे संगितल आहे.

पुढे ते म्हणाले की चित्रपटात मुख्य भूमिका सकारणारे अभिनेते सुबोध भावे यांनी सांगावं की मी चुकीचा आहे. किंवा माझी मागणी चुकीची आहे. समोर येऊन त्यांनी मला सांगावं असं आव्हानही संभाजीराजे यांनी दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT