shambhuraj desai esakal
महाराष्ट्र बातम्या

Liquor : गोव्यातून दारू आणाल तर खबरदार; होणार मोक्कांतर्गत कारवाई

गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Sambhuraj Desai On Goa Liquor : गोव्यातून दारू आणणाऱ्यांवर येथून पुढे मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. एकच व्यक्ती तीनवेळा अशा प्रकरणात दोषी आढळल्यास त्या व्यक्तीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे देसाई म्हणाले. गोव्यातून अवैधरित्या आणल्या जाणाऱ्या मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. याबाबत कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहेत.

गोव्यातील दारू गोव्यात द्यावी

पुढे बोलताना देसाई म्हणाले की, गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. मात्र, त्याचा अर्थ आपल्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार गोवा सरकारला नाही. त्यामुळे जर त्यांना दारु घ्यायची आहे त्यांनी गोव्यात ती घ्यावी मात्र, ती राज्यात आणू नये. जर, एखाद्या व्यक्तीकडून तीन वेळा जर अशा पद्धतीचा गुन्हा घडला तर त्यावर मोक्का लावता येईल का? हे तपासून त्यांच्यावर मोक्का लावला जाईल असे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.

याशिवाय तात्पुरत्या स्वरुपासाठी चेकपॉइंट्स उभारण्याच्या संदर्भात सूचनादेखील अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे देसाई म्हणाले. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात दारु तस्करीचे प्रमाण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देण्यासाठी केला इंडिगो विमानाने प्रवास

आजोबांच्या धाकाने शेणाने जमीन सारवायची माधुरी दीक्षित; मूळ कोकणातली आहे धकधक गर्ल, गावाचं नाव माहितीये?

SCROLL FOR NEXT