rain Forecast Weather update monsoon Yellow Alert  sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : पुणे, मुंबईसह राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ; पुढील ४८ तास महत्त्वाचे, आज 'या' भागात अतिवृष्टीचा इशारा

अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरासह अनेक राज्यांमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. तर राज्यात पुणे, मुंबईसह अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाचा जोर दिसून येत आहे. राज्यात पुढील ४८ तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आजही पुणे मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान सप्टेंबर महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईसह पुण्यामध्ये वातावरण ढगाळ राहील. मुंबईच्या काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्याच्या अनेक भागात काल (रविवारी) मुसळधार पावसाने हजेरी लावली. पुण्यासह आसपासच्या भागांमध्ये पावसाचा जोर दिसून आला.

यंदा मान्सूनमध्ये देशात सरासरीच्या 94 % पाऊस झाला आहे. तर राज्यात सरासरीच्या 97 टक्के पाऊस झाला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला, अमरावती, बीड या 9 जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी नोंदवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil vs Gopichand Padalkar : इतिहास सांगताना पडळकर चुकले, जयंत पाटलांनी लगावला टोला, म्हणाले, अफझलखानाचा कोथळा पन्हाळगडावर...

Stock Market Today: ट्रम्पला धक्का अन् शेअर बाजारात गुंतवणूकदारांची दिवाळी! 5 मिनिटांतच सेन्सेक्स 1,400 अंकांनी उसळला; निफ्टीही सुसाट

Sahar Shaikh : औरंगजेबाचं कौतुक करणारी पोस्ट; AIMIM च्या नगरसेविका सहार शेख नव्या वादात, सोशल मीडियावर टीकेची झोड

Latest Marathi News Live Update : जि.प. अधिकाऱ्याच्या घरात अन् बँक लॉकरमध्ये सापडले ५.१६ कोटींचे घबाड

पराभवानंतर ट्रम्प यांचा भारताला धक्का; 9 कंपन्यावर घातली बंदी; व्यावसायिक दाम्पत्य टार्गेटवर

SCROLL FOR NEXT