Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून राज्यासह देशात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान आजही हवामान विभागाने राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आली आहे. तर राज्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

आज पुण्याला आणि मुंबईला आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी मुसळधाप पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांनाही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 1 ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहेत. तर 2 ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, मुंबई उपनगरासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल तर काही ठिकाणी कमी प्रमाणात असेल. गुरुवारीही मुंबई, ठाणे, रायगडसह कोकण किनारपट्टी भागात पावसाने हजेरी लावली होती. आज ठाणे जिल्ह्याला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यासोबत रायगड आणि रत्नागिरीसाठीही पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पश्चिम बंगाल आणि ओडिशासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Lonar Lake Development: पर्यटकांना मिळणार लोणार सरोवराची वैज्ञानिक व ऐतिहासिक माहिती

Ichalkaranji : मला जगायचं नाही सोडा, महिला जीवनाला कंटाळून इचलकरंजी घाटावर गेली अन्...

Fake Currency: धाड परिसरात बनावट नोटा चलनात; पोलिस व बँक प्रशासनाकडून आवाहनः व्यापारी व नागरिकांन सतर्क राहावे

SCROLL FOR NEXT