weather update rain forecast imd marathi news sakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: राज्यात आजही अवकाळी पावसाची शक्यता, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

महाराष्ट्रासह, तामिळनाडू, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता

अंकिता खाणे (Ankita Khane)

वादळी वारे आणि गारपिटीसह कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे फळबांगानांही मोठा फटका बसला असून, पुढील काही तासांसाठी राज्यात वादळाचे इशारे देण्यात आले आहेत. राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता आहे.

हवामान विभागाने पुण्यासह नाशिक, अहमदनदर, छत्रपती संभाजीनगर, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. यासोबतच आज विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्याच्या काही भागांमध्ये आजही पावसाचीही शक्यता आहे.

आज राज्यभरात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर काही भागात पावसाची शक्यता आहे. राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी दुबार पेरणी केलेल्या पिकांना गारांचा आणि पावसाचा मोठा फटका आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान आज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर तामिळनाडू, पुद्दुचेरी , कराईकल , केरळ आणि माहे या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT