Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: देशभरात मान्सून सक्रिय! हिमाचल प्रदेशात ढगफुटी, उत्तराखंडमध्ये भूस्खलन; तर मुंबईसह दिल्लीत ठिकठिकाणी साचलं पाणी

देशभरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे, तर पर्वतीय भागात अलर्ट जारी

अंकिता खाणे (Ankita Khane)

जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दडी मारून बसलेला मान्सून सक्रीय झाला. देशाभरातील अनेक राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे काही डोंगराळ भागातील लोकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. उत्तराखंडमध्ये काही भागात भूस्खलनाच्या घटना समोर आल्या आहेत. तर शिमल्यात ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट तर हिमाचल प्रदेशमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पावसानंतर मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्येही सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांत देशातील विविध भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Latest Marathi News)

मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे देशात काही ठिकाणी ढगफुटी, भूस्खलन झाल आहे. तर पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु असून या भागात हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

तर राजधानी दिल्ली येथे अनेक भागांमध्ये रविवारी सकाळपासून पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत अंबाला, कर्नाल, नारनौल, रोहतक, भिवानी, गुरुग्राम, कुरुक्षेत्र आणि मोहालीच्या अनेक भागात पाऊस झाला. याशिवाय पंजाब आणि हरियाणामध्येही पाऊस पडला.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT