Rain Update esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: पावसाचं कमबॅक कधी? हवामान विभागाच्या अंदाजानुसार 'या' तारखेपासून पावसाची शक्यता

कोकण आणि विदर्भात पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यासह देशभरात पावसाचा जोर ओसरल्याचं दिसून येत आहे. भारतीय हवामान विभागातर्फे ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमण कधी होणार याकडे लक्ष ठेवून आहेत.

जून महिन्याच्या शेवटी पाऊस सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण वाढलं होते. त्यामुळे दिलासा मिळाला होता. भारतीय हवामान विभागाकडून १८ ऑगस्टनंतर पुन्हा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात १८ ऑगस्टपासून पावसाची शक्यता आहे. राज्यात १८ ते २४ ऑगस्ट आणि २५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात देखील पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात सरासरी पाऊस होईल, असं अपेक्षित असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी विदर्भात अतिवृष्टी झाल्याचे पाहयला मिळाले होते. अनेक गावे पाण्याखाली गेल्यानंतर आता मागील सात दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली आहे. याचा फटका सोयाबीन पिकाला बसण्याची शक्यता आहे. सध्या पिकाला पावसाची गरज असून फुलोऱ्यात आलेलं सोयाबीन पिक पावसावाचून वाया जाण्याची शक्यता आहे. तसेच यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट देखील ओढावण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime: नागपूर शहरातील ऑनलाइन बेटिंगची लिंक दुबईपर्यंत; दिल्ली- राजस्थानात मास्टरमाईंड, ५०० रुपयांचा फ्रॉड आता कोट्यवधीपर्यंत!

Breaking News Live Update: धाराशिव मधील विमानतळावर शिवसैनिक व पोलिसात बाचाबाची

Vastu Tips : किचनमध्ये नक्की ठेवा 'या' 5 वस्तू; घरी होणार नाही पैशाची कमी, कुटुंबातल्या आरोग्याच्या समस्या होतील दूर, नोकरी-धंद्यात यश

Vidarbha Premier League 2026: विदर्भ प्रीमियर लीगचा थरार १ जूनपासून; नवे नाव, अधिकृत लोगो, शुभंकरचे थाटात अनावरण, यंदा २७ सामने

8th Pay Commission ची पुणे अन् दिल्लीत 'या' तारखेला महत्त्वाची बैठक, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ अन् पेन्शनबाबत होणार मोठा निर्णय?

SCROLL FOR NEXT