Maharashtra Rain Update 
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील ३-४ दिवस मेघगर्जनेसह पाऊस; २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट

राज्यात येत्या तीन-चार दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रोहित कणसे

राज्यात यंदा अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणीटंचाई जाणवण्याची शक्याता आहे. राज्यात येत्या तीन-चार दिवसांत महाराष्ट्राच्या काही भागात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तसेच शनिवारी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवमान विभागाने व्यक्त केली आहे. या २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.

कुठे होणार पाऊस?

राज्यात २५, २६, २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता असून ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

य़ासोबतच विदर्भात बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पावसाच्या आगमनाने येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT