Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update : शेतकऱ्यांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे! 'या' राज्यात कोसळणार अवकाळी पाऊस

उत्तर भारतात थंडीची लाट वाढत असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

रोहित कणसे

उत्तर भारतात थंडीची लाट वाढत असताना पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. येत्या ४८ तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान आता पाऊस पडल्यास रब्बी हंगामातील गहू, हरबरा, करडी इत्यादी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

येत्या ४८ तासांत मध्य महाराष्ट्र, बिहार, झारखंड आणि रायलसीमा या काही ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. तर तमिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीप येथे मुसळधार पावसाची शक्यता आहे. खासगी हवामान अंदाज एजन्सीने हा अंदाज व्यक्त केला आहे.

उत्तर भारतात थंडीचा कडाका!

उत्तर भारतातील अनेक राज्य सध्या कडाक्याच्या थंडीचा सामना करत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पंजाब, हरियाणा, चंदगड, दिल्ली आणि राजस्थान मध्ये पुढील गोन दिवस कोल्ड ते गंभीर कोल्ड डे स्थिती पाहायला मिळणार आहे. तसचे उत्तर पश्चिम भारतातील राज्यात पुढील दोन दिवस भयंकर धुके पाहायला मिळेल. तसेच हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार उत्तर पश्चिमेकडील राज्यात पावसाची शक्यता देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : सरकार जाणूनबुजून हलगर्जीपणा करत आहे : मनोज जरांगे पाटील

Vivoचा मोठा धमाका! Vivo Y31t 5G ची किंमत झाली फक्त 24,695; Flipkart वर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी...

गर्दीत बसमध्ये चढताना धक्का लागून पडली, एसटीच्या चाकाखाली चिरडून १७ वर्षीय तरुणीचा मृत्यू; आईच्या डोळ्यादेखत घटना

SCROLL FOR NEXT