Maharashtra Weather Update esakal
महाराष्ट्र बातम्या

Weather Update: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये 6 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

Maharashtra Weather Forecast update: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २) सर्व भूभाग कवेत घेत देश व्यापला आहे. यंदा केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल ६ दिवस अगोदर देश व्यापला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) मंगळवारी (ता. २) सर्व भूभाग कवेत घेत देश व्यापला आहे. यंदा केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनने तब्बल ६ दिवस अगोदर देश व्यापला आहे. जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी ८९ टक्के पाऊस झाला आहे. यंदा मॉन्सूनची वाटचाल काहीशी वेगवान झाल्याचे दिसून आले.

१९ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेल्या मॉन्सूनवर 'रेमल' चक्रीवादळाचा प्रभाव पडला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे कोकणात मात्र अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाने अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आहे. त्याचबरोबर काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय 05 आणि 06 जुलै रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईला जायचं फायनल! ४ मुक्काम, ५ दिवस; बीड-नगर-पुणे-मुंबई, कसा असेल मार्ग? जरांगेंनी सांगितला प्लान

बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Rishi Panchami 2026: ऋषी पंचमी महिलांसाठी खास का असते? १०८ वेळा आघाड्याच्या काडीने दात घासण्यामागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT