The impact of research at Nagpur University on the world Nagpur university news
The impact of research at Nagpur University on the world Nagpur university news 
महाराष्ट्र

नागपूर विद्यापीठातील संशोधनाचा प्रभाव जगभरात; जागतिक पातळीवर दखल

मंगेश गोमासे

नागपूर : ३० वर्षांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विज्ञान विभागातील प्राध्यापकांनी नेत्रदीपक संशोधन केल्याचे समोर आले आहे. या संशोधनाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. याबाबत विद्यापीठातील ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पूजा दाढे आणि आर. एस. मुंडले धरमपेठ कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ. मंजू दुबे यांनी ‘स्कोपस’लिस्टेड अमेरिकन जर्नलमध्ये पेपर प्रकाशित केला आहे.

विद्यापीठाची स्थापना १९२४ साली करण्यात आली. विद्यापीठ परिसरात विविध विभागांची निर्मिती करण्यात आली. या विभागांमध्ये औषधनिर्माणशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित यासह ४२ पेक्षा अधिक विभागांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने संशोधनाकडे विशेष लक्ष देण्यात आले. त्यातूनच १९९० ते २०१९ यादरम्यान विद्यापीठातील विज्ञान शाखेच्या विभागांमध्ये नेमके कोणते संशोधन झाले, त्यातून नेमके काय बाहेर पडले, त्या संशोधनाचा जागतिक स्तरावर काय प्रभाव आहे याची माहिती घेण्यात आली.

३० वर्षांत विद्यापीठाच्या विज्ञान विभागातून २ हजार २२९ संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आलेत. त्याचा वार्षिक विकास दर ६.२३ टक्के इतका आहे. त्यात सर्वाधिक ७२४ संशोधन हे भौतिकशास्त्र विभागाद्वारे करण्यात आले आहे. त्यानंतर रसायनशास्त्र विभागात ४७२ संशोधनांचा समावेश आहे.

याशिवाय इतरही विज्ञान शाखांतील विभागांचा समावेश आहे. त्यामुळे निश्चितच विद्यापीठांमध्ये उच्च प्रतीचे संशोधक केले जाते. विशेष म्हणजे, या संशोधनाची दखल अमेरिका, इंग्लंड, चीन, कोरिया, जपान, इटली, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, मोरोक्को, दक्षिण आफ्रिका, इराण, स्लोव्हाकिया, कतार, स्वित्झरलॅंड यांसारख्या देशांतील संशोधकांनी घेतल्याचे दिसून येते. 

विद्यापीठाकडून अधिक प्रयत्न व्हावे

संशोधन पेपरमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार असे आढळले आहे की, काही विभाग उच्च प्रतीचे संशोधन करीत आहेत. याशिवाय त्यामधील प्राध्यापकांचे बरेच संशोधन पेपर नामांकित संशोधन प्रकाशनात प्रकाशित करण्यात आले आहेत. यामुळे नागपूर विद्यापीठाच्या एकूण संशोधनात विज्ञान शाखेचे मोठे योगदान प्रतिबिंबित होते. यामध्ये प्रामुख्याने भौतिकशास्त्र विभागातील डॉ. एस. व्ही. मोहरील आणि त्यानंतर डॉ. संजय ढोबळे यांचा समावेश आहे. संशोधनाचा टक्का वाढविण्यासाठी विज्ञान विषयातील संशोधनाला चालना देण्यासाठी अधिक प्रयत्न विद्यापीठाकडून करण्याची अपेक्षा आहे. 

विद्यापीठाचे संशोधन

विभाग संशोधन
भौतिकशास्त्र ७२४
रसायनशास्त्र ४७२
औषधीनिर्माणशास्त्र ११८
अभियांत्रिकी विज्ञान ११०
बायोकेमिकल सायन्सेस ८६

विद्यापीठाचा नावलौकिक जगभरात
विद्यापीठाच्या विज्ञान विभागातून उच्च प्रकारचे संशोधन आतापर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यापीठाचा नावलौकिक जगभरात झाल्याचे दिसून येते. ‘स्कोपस’लिस्टेड अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित संशोधन पेपरमध्ये ते सिद्ध झाले आहे. 
- डॉ. पूजा दाढे,
प्राध्यापिका, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT