exam 
महाराष्ट्र बातम्या

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... भूगोल विषयाबाबत बोर्डाने घेतला हा निर्णय 

मंगेश गोमासे

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीच्या सामाजिक शास्त्रामधील 23 मार्चला होणारा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला होता. या विषयाच्या गुणदान पद्धतीबाबत कुठल्याही निर्णय घेण्यात आला नव्हता. मात्र, आता या विषयाचे गुणदान सरासरी पद्धतीने होणार असल्याची माहिती बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सकाळशी बोलताना दिली. 

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावाने 21 मार्चपासून राज्यात टाळेबंदी लावण्यात आली. यामुळे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी भूगोलचा पेपर रद्द करण्याचे ठरविले. यानंतर प्रादुर्भाव वाढतच असल्याने पेपर घेण्यात येणार नाही, असे स्पष्ट केले. मात्र या पेपरचे गुणांकन कसे होणार याबाबत पालकांमध्ये बराच संभ्रम होता. विशेष म्हणजे, त्यामुळे कुणावर अन्याय होऊ नये म्हणून तज्ज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्यात आली होती.

या समितीने अहवाल सादर करीत सर्व पेपरमध्ये आलेल्या गुणाच्या आधारावर गुणांकन करण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी अधिकृत माहिती अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली. विशेष म्हणजे, शिक्षक भारतीचे विभागीय अध्यक्ष प्रा. सपना नेहरोत्रा यांनी हा पर्याय दीड महिण्याआधी सुचविला होता.

सुचविण्यात आलेले पर्याय
दहावीच्या गुणपत्रिकेत ( १ ) ६०० गुणांऐवजी ५५० गुणांनुसार टक्केवारी काढण्यात यावी किंवा ( २ ) बेस्ट ऑफ फाईव्ह च्या आधारे निकाल लावण्यात यावा किंवा ( ३ ) सर्व विषयात मिळणारे सरासरी गुण भूगोल विषयाला देण्यात यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video:'जेसीबी'च्या सहाय्याने शाळकरी मुलांना केलं रेस्क्यू; नागपूरमध्ये पावसाचा हाहाःकार, व्हिडीओ व्हायरल

Pune FDA Action: पुण्यात एफडीएची मोठी धाड: मध्‍यवस्‍तीतील मिठाई, कँडी व चॉकलेटचा ५५ लाखांचा निकृष्ट साठा जप्त

Pune Hinjewadi Metro: हिंजवडी–शिवाजीनगर मेट्रो पहिल्या टप्प्यासाठी सज्ज; सीएमआरएस मंजुरीनंतर उद्‌घाटनाच्या मुहूर्ताकडे पुणेकरांचे लक्ष

Pune Illegal Construction: पुणे महापालिकेची बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई; लोहगाव-खराडीतील २१,४०० चौरस फूट आरसीसी इमारत जमीनदोस्त

Maratha Quota Meet: अंतरवली सराटीत मराठा सेवकांची तातडीची बैठक; आरक्षणासह आगामी आंदोलनाच्या रणनीतीकडे राज्याचे लक्ष

SCROLL FOR NEXT