Sharad Pawar And Imtiaz Jaleel  esakal
महाराष्ट्र बातम्या

"पवार बोलतात ते..." Open mike मध्ये जलील यांनी घेतली फिरकी

इम्तियाज जलील यांनी घेतली फिरकी

सकाळ डिजिटल टीम

कंगना राणावत भाजपची भावी राज्यसभा खासदार असल्याचे भाकित खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी वर्तवले आहे. दुसरीकडे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना ड्रामा क्विन असल्याचे त्यांनी सांगितले. सकाळच्या सरकारनामा ओपन माईकच्या 'फेसऑफ'मध्ये जलील बोलत होते. यावेळी राज्याच्या उद्योग, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार इम्तियाज जलील, श्रीकांत शिंदे, आमदार धीरज देशमुख, परिणय फुके आदी उपस्थित होते. फेसऑफमध्ये ही राजकीय मंडळी विविध क्षेत्रांतील व्यक्तींचा छायाचित्र पाहून बोलत होते. जलील पुढे म्हणाले, राम कदम म्हणजे बडबड. जगाच्या बाहेरील प्रश्न जरी असला तरी त्याचे उत्तर त्यांच्याकडे राहिल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा पाहून जलील आवाक् झाले. अरे बाप रे ! मी घाबरलो.. ईडी, असे म्हणत त्यांनी शहा यांना टोला लगावला आहे. (Imtiaz Jaleel Speaks On Sharad Pawar In Sarkarnama Open Mic Challenge)

विजय मल्ल्या शो मॅन. कंगना राणावत यांचा चेहरा पाहून जलील म्हणाले, भाजपची पुढील राज्यसभा खासदार. अनिल देशमुख- १०० कोटींचा आकडा त्यांना आठवला. शशी थरुर म्हणजे जिकडे गुळ तिकडे माशी, अशी टीका त्यांनी केली. व्लादिमिर पुतीन हे जगासाठी धोकादायक माणूस असल्याचे ते म्हणाले. शरद पवार (Sharad Pawar) - जे बोलतात, ते करत नाही, मात्र जे करतात ते बोलून दाखवत नाही, अशा शद्बांत जलील यांनी पवार यांची फिरकी घेतली. कितीही महाराष्ट्रात करा मात्र ना ना.. ना होणार असे म्हणत त्यांनी नाना पटोले यांची खिल्ली उडवली. नवनीत राणा.. त्या माझ्या बरोबरच असतात. मी काही बोललो तर वाद होईल. त्या ड्रामा क्विन असल्याचे जलील म्हणाले.

कोरोनाची दोन वर्ष झाली. आता खूप झालं. महेश मांजरेकर - चांगला डिरेक्टर आहे. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतो' हा चित्रपट आवडत असल्याचे शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. चिन्मय मांडलेकर हा जबरदस्त अभिनेता आहे. बिचकुलेंवर काय बोलावे, असा सवाल त्यांनी केला. रामदास आठवले - गो कोरोना ही कविता आठवत असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे सगळ्यांसाठी हिंदू हृदयसम्राट आणि आमच्यासाठी दैवत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे पाहून आपले बारा थांबवून ठेवले ना, असे म्हणाले. ईडीचे चित्र पाहून काय ओ नेक्स्ट नंबर कोणाचा आहे?, असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजप आमदार परिणय फुके यांना केला. किम ऊन जोंग म्हणजे पुतीन यांची छोटी आवृत्ती. नरेंद्र मोदींचे छायाचित्र पाहून पंधरा लाख कधी येणार ?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

SCROLL FOR NEXT