sakal
महाराष्ट्र बातम्या

Koyta Gang Pune:पुण्यात आता चॉकलेटसाठी कोयत्याची दहशत! काय घडलंय वाचा

Death Threat for Chocolate: आता चॉकलेटसाठीही दाखवाला लागतोय कोयत्याचा धाक, पुण्यातील कोयता सत्रात आणखी भर

सकाळ डिजिटल टीम

Pune crime: पुण्यात सध्या कोयता गॅंगचा सुळसुळाट सुरु आहे. विविध गुन्हेगारी कृत्ये करण्यासाठी हे कोयताधारी गुंड शहरात दहशत माजवताना अनेकदा दिसून आले आहेत.

नुकतीच पुण्यात एक अशी घटना घडलीये, जी ऐकल्यावर तुम्हीही डोक्याला थाप माराल. एकाने चक्क फुकट चॉकलेट मिळवण्यासाठी दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवला. चॉकलेटसाठी कोयत्याचा धाक दाखवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची धिंड देखील काढली.

पुण्याच्या मुंढवा परिसरात १८ ते २० वयोगटातील काही मुलांनी एका मेडीकलमध्ये घुसून कॅडबरी मागण्याच्या बहाण्याने कोयत्याने हल्ला केला. ही सर्व घटना मेडिकलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध घेतला. शोध घेतल्यानंतर या चॉकलेटबहाद्दरांची भररस्त्यात धिंड काढली.(Latest Marathi News)

पुण्यात काही दिवसांपुर्वी एका महाविद्यालयीन तरुणीवर तिच्याचं मित्राकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. शेजारी उभ्या असणाऱ्या तरुणांनी त्या मुलाचा वार झेलत, मुलीचा जीव वाचवला. पोलिसांनी कोयता गॅंगविरुद्ध कोंबिंग ऑपरेशन राबवलं होतं.

कोयता घेऊन फिरणाऱ्या गुंडांना पकडून त्यांची पोलिसांनी शहरातून अनेकदा धिंडही काढली आहे, पण या घटना थांबायचं नाव काही घेत नाहीत.(Latest Marathi News)

पुणे पोलिस दलातील डीसीपी संदीप गील यांनी चक्क गुन्हेगारांना तंबीच दिलीये की तुम्ही हातात कोयता घ्या, मग तुम्हाला दाखवतोचं. पुणे पोलिसांना या घटना आटोक्यात आणण्यासाठी कडक पाऊलं उचलावी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT