mahapalika solapur 

sakal

महाराष्ट्र बातम्या

सोलापूर महापालिकेत नगरसेवक 102 अन् महाविकास आघाडीतील ‘या’ 6 पक्षांनी मागितल्या 154 जागा; वंचित बहुजन आघाडी प्रतीक्षेतच; MIM ‘या’ १० प्रभागात स्वबळावर, वाचा...

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली, पण महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झाले नाही. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १०२ पैकी ३५ जागांची मागणी केली आहे. काँग्रेसने ६० आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने ४० जागा मागितल्याने इतरमित्र पक्षांना किती जागा सोडायच्या, यावर महाविकास आघाडीची चर्चा सुरु आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली, पण महाविकास आघाडीचे जागा वाटप अंतिम झाले नाही. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने १०२ पैकी ३५ जागांची मागणी केली आहे. काँग्रेसने ६० आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने ४० जागा मागितल्याने इतरमित्र पक्षांना किती जागा सोडायच्या, यावर महाविकास आघाडीची चर्चा सुरु आहे.

भाजपने त्यांच्या उमेदवारांची यादी अंतिम केली आहे, पण नावे जाहीर केली नाहीत. दुसरीकडे भाजपमधील नाराजांवर त्यांच्या मित्रपक्षांचा डोळा आहे. महायुतीतील तीनही पक्षातील बंडखोरीचा सर्वाधिक लाभ आपल्याला होईल, या आशेने मविआचे जागावाटप निश्चित होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाने एक पाऊल मागे सरकण्याचीही तयारी ठेवली आहे. अशीच तयारी अन्य पक्षांची आहे.

सर्व पक्षांनी पहिल्या बैठकीत जागांची मागणी केली, पण आता कोणत्या जागांवर कोणाची ताकद अधिक, याचा अंदाज घेतला जात आहे. आघाडी केल्याशिवाय महायुतीला यशस्वी टक्कर देणे शक्य नसल्याचे आघाडीतील सर्व पक्षांना जाणीव आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी एक पाऊल मागे घेण्याची भूमिका ठेवली आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत जागा वाटप अंतिम होईल, असे सर्व पक्षातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

आघाडीतील जागांची मागणी

  • काँग्रेस : ६०

  • शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : ४०

  • राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार : ३५

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना : ०५

  • माकप : १२

  • समाजवादी पार्टी : ०२

राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर ठाम

भाजपने स्वबळाची तयारी केल्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने १०२ जागांसाठी इच्छुकांच्या आज (सोमवारी) मुलाखती घेतल्या. ४६५ जण इच्छुक असल्याचे पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तरीपण, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी युतीचा निर्णय घेतला तर आमची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. तूर्तास, स्वबळाची तयार केल्याचेही ते म्हणाले.

‘एमआयएम’ १० प्रभागात स्वबळावर लढणार

सोलापूर : शहरातील प्रभाग एक, दोन, सहा, आठ, १४, १६, १८, २०, २१ व २२ अशा एकूण दहा प्रभागांमध्ये ‘एमआयएम’ स्वबळावर निवडणूक लढणार आहे. शहराध्यक्ष शौकत पठाण यांनी त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. महापालिकेच्या १०२ पैकी ५० जागा लढण्याची तयारी एमआयएमने केली आहे. ‘एमआयएम’कडून निवडणूक लढण्यास १०५ उमेदवार इच्छुक असल्याचेही सांगण्यात आले. ‘एमआयएम’चे माजी खासदार इम्तियाज जलिल हे २५ डिसेंबर रोजी सोलापुरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती पार पडतील आणि त्याच दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म देखील दिले जाणार आहेत. काही मोजके प्रभाग वगळता काँग्रेससमवेत जुळवून घेता येईल का, याची चाचपणी ‘एमआयएम’च्या पदाधिकाऱ्यांनी केली. मात्र, काँग्रेसने कोणताही प्रतिसाद न दिल्याने ‘एमआयएम’ आता १० प्रभागांमध्ये स्वतंत्र लढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! विद्यार्थी-शिक्षकांची आता ऑनलाईन हजेरी; सर्व शाळांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत, त्यानंतर मुख्याध्यापकांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यात पाच ठिकाणी ईडीचे छापे'; दोन जणांना घेतले ताब्यात, नेमकं काय आहे कारण?

‘टीईटी’चा निकाल १५ जानेवारीपूर्वी! उत्तरसूचीवरील आक्षेपासाठी २८ डिसेंबरपर्यंत मुदत; प्रत्येक उत्तरपत्रिकेची होणार फेरपडताळणी, पुढच्या वर्षी दोनदा ‘टीईटी’

सोलापूर शहरातून 2 वर्षांत 155 जण तडीपार अन्‌ 50 गुन्हेगारांची येरवडा कारागृहात रवानगी; पोलिस आयुक्तांची रेकॉर्ड ब्रेक कारवाई; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

आजचे राशिभविष्य - 24 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT