Maharashtra University of Health Sciences  esakal
महाराष्ट्र बातम्या

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या परीक्षा आता १५ जुलैपासून

अरुण मलानी

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठातर्फे (Maharashtra University of Health Sciences) उन्‍हाळी सत्र २०२२ परीक्षांचे आयोजन दोन टप्‍यांमध्ये केले आहे. याअंतर्गत दुसऱ्या टप्‍यातील परीक्षांना १ जुलैपासून सुरुवात होणार होती. मात्र विद्यापीठातर्फे परीक्षेचे पुनर्नियोजन केले असून, सुधारीत वेळापत्रकानुसार राज्‍यभरातील परीक्षा केंद्रांवर १५ जुलैपासून परीक्षा घेतली जाणार आहे.

आरोग्‍य विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्‍या स्‍वाक्षरीचे पत्र विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर अपलोड करण्यात आले आहे. या परिपत्रकात परीक्षेच्‍या वेळापत्रकात बदल केले असल्‍याचे नमूद केले आहे. पदवी व पदव्‍युत्तर पदवी अशा दोन्‍ही अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे. पदवी अभ्यासक्रमांतर्गत एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएचएमएस, बी.एस्सी, फिजिओथेरपी, ऑक्‍युपेशनल थेरपी आदी शिक्षणक्रमांचा समावेश आहे.

पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रमात डॉक्‍टर ऑफ मेडिसिन (डीएम), एमडीएस, डिप्‍लोमा डेटिस्‍ट्री, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी, डिप्‍लोमा आयुर्वेद, एम.एस्सी. नर्सिंग, फिजिओथेरेपी व एम.ए्सी.तील विविध विषयांचा समावेश आहे. याशिवाय विद्यापीठ स्‍तरावरील विविध शिक्षणक्रमांच्‍या परीक्षा या सुधारीत वेळापत्रकानुसार होतील.

असे आहेत बदल...

यापूर्वीच्‍या नियोजनानुसार दुसऱ्या टप्प्‍यातील परीक्षा १ ते २१ जुलै या दरम्‍यान पार पडणार होत्‍या. परंतु आता सुधारीत वेळापत्रकानुसार या परीक्षांना १५ जुलैपासून सुरुवात होणार असून, ४ ऑगस्‍टपर्यंत या लेखी परीक्षा राज्‍यभरातील परीक्षा केंद्रांवर पार पडतील. महाविद्यालयांनी सुधारीत वेळापत्रकाची नोंद घेत विद्यार्थ्यांना कळवावे, असे आवाहन परिपत्रकात केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT