पेपरफुटी प्रकरण Sakal
महाराष्ट्र बातम्या

पेपरफुटी प्रकरणात बीडमधील आणखी एक शिक्षक ताब्यात; सायबर विभागाची कारवाई

आरोग्य विभागाच्या गट 'क' पेपरफुटी प्रकरणात, पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने बीडमधून आणखी एका जिल्हा परीषद शिक्षकाला ताब्यात घेतल आहे.

शरयू काकडे

आरोग्य विभागाच्या (Department of Health) गट 'क' पेपरफुटी प्रकरणात (Exam fraud), पुण्याच्या सायबर विभागाच्या पथकाने (Squad of Pune Cyber Department-Pune) बीडमधून (Beed) आणखी एका जिल्हा परिषद शिक्षकाला (Teacher Arrested) ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या शिक्षकाचे नाव ‘नागरगोजे’ (Nagargoje)असून गेल्या 15 दिवसांपासून पुण्याचे पथक बीडमध्ये या शिक्षकाचा शोध घेत होते.

आरोग्य विभागाच्या गट 'क' भरती प्रक्रियेत पेपरफुटी प्रकरणात बीडच्या शिरूर तालुक्यातील, तितरवणी येथील शिक्षक उध्दव प्रल्हाद नागरगोजे याला अटक झाली होती. उध्दव नागरगोजेचा आणि गळाला लागलेल्या या जिल्हा परिषद शिक्षक नागरगोजेचा जवळचा संबंध असल्याचं बोललं जात आहे.

पेपरफुटी प्रकरणात बीड जिल्ह्यातील उध्दव प्रल्हाद नागरगोजे , प्रशांत व्यंकट बडगीर, डॉ.संदीप त्रिंबकराव जोगदंड, शाम महादू मस्के, नामदेव विक्रम करांडे इत्यादी आरोपींना आतापर्यंत अटक झाली आहे. या सर्वांनी काही अधिकाऱ्यांना आणि परीक्षा घेणाऱ्या आयटी कंपन्यांमधील लोकांना हाताशी धरून आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका फोडल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT