Ramdas Athawale
Ramdas Athawale Esakal
महाराष्ट्र

Ramdas Athawale: भाजपसोबत का गेलो... रामदास आठवलेंनी दिलं काव्यमय शैलीत उत्तर, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

आज संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेत भाषणं आणि आपापले मुद्दे आणि इतर गोष्टी मांडणे सुरू आहे. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले बोलण्यासाठी उभे राहिले आणि आपल्या विशेष कवितेने बोलण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर उपराष्ट्रपती जगदीप धनखड़ यांचं कौतुकही आठवलेंनी केलं आहे. मंत्री नाही केलं म्हणून मी काँग्रेसची साथ सोडल्याचं सांगताना रामदास आठवले यांनी कविता सादर केली अन् त्यातून ते असंकाही बोलले की सभागृहात एकच हशा पिकला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि राज्यसभेचे सभापती यांच्या अभिनंदनपर भाषणात ते बोलत होते.

आदरणीय महोदय, मैं तो अन्याय के खिलाप लढा हूं म्हणत त्यांनी सुरवात केली. ते त्यांची कविता ऐकवताच सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर त्या कवितेमध्येच ते सांगतात की, मी शिर्डीमधून उभा राहिलो मी तिथं पडलो. त्यानंतरही मी फिरत राहिलो, मी कॉग्रेस सोबत गेलो. तिथं माझे खूप सारे मित्र आहेत. पुन्हा समाजवादी पक्षाचे, कम्युनिस्ट पार्टीचे माझे मित्र आहेत. आता भाजपमध्ये माझे मित्र आहेत.

हे ही वाचा : Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

आता मी भाजप सोबत आलो आहे. मी भाजपसोबत येण्याचं कारण म्हणजे मी शिर्डीत पडलो. मला शिर्डीत पाडण्यात आलं. मला मंत्रिपदही नाही दिलं. मग मी तिकडे काय करू. त्यामुळं मला कॉग्रेस सोडवं लागलं. आणि आता मी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सबका साथ सबका विकास सोबत आलो आहे. हा जो काही प्रकाश दिसतो आहे तो नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आहे. मी बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी आहे. ते म्हणतात सत्तेत गेलं पाहिजे. आणि माझी एकट्याची पार्टी सत्तेत येऊ शकत नाही म्हणून मी भाजपसोबत आलो आहे. त्यांच्यासोबत मी जिंकू शकतो असंही आठवले पुढं बोलताना म्हणाले आहेत.

पुढे बोलताना रामदास आठवले म्हणाले की, माझ्या पक्षातले लोक मला विचारतात की, आपल्या पक्षाचा एकही नेता लोकसभेत नाही राज्यसभेत नाही तरी तुम्ही मंत्री कसे झाला आहे. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही नरेंद्र मोदी यांना विचारा. मी जरी एकटा मंत्री असलो तरी माझ्या पक्षाचे लोक सगळीकडे आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT